Verca Paragliding Accident Dainik Gomantak
गोवा

Verca Parasailing Accident: पॅराशूट भरकटले आणि अडकले माडात! ‘त्या’ व्यावसायिकाचा परवाना रद्द; पर्यटन खात्‍याची कारवाई

Verca Paragliding Accident: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आणि शुक्रवारी तातडीने वॉटर स्पोर्टस्‌ ऑपरेटर्सची संयुक्त बैठक घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: वार्का येथे धोकायक जागेत पॅरासेलिंग करणाऱ्या ‘त्या’ व्यावसायिकाचा परवाना शेवटी पर्यटन खात्याने रद्द केला. मागच्या शुकवारी माड असलेल्या जागेत पॅरासेलिंग करत असताना पॅराशूट माडाच्या झावळात अडकल्यामुळे अपघात घडला होता.

सदर घटनेमुळे असुरक्षित पॅरासेलिंग व्यवसायाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. या घटनेची गंभीर दखल पर्यटन खात्याने घेतली आणि ‘त्या’ वॉटर स्पोर्टस्‌ ऑपरेटरला काम बंद ठेवण्याचा आदेश दिला, अशी माहिती पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे यांनी दिली.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आणि शुक्रवारी तातडीने वॉटर स्पोर्टस्‌ ऑपरेटर्सची संयुक्त बैठक घेतली. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याची आणि सुरक्षित उपक्रम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत संबंधितांना दिले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीची बैठक घेतली. तसेच ‘त्या’ वॉटर स्‍पोर्टस्‌ ऑपरेटरला कुठलेही काम करण्यास मनाई केली आहे. पॅरासेलिंग अडकण्याची घटना पर्यटन विभागाने निर्देशित करून दिलेला जागेबाहेर घडली आहे.

- राजेश काळे, दरम्यान, उपसंचालक (पर्यटन खाते)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

SCROLL FOR NEXT