Madgaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेचा नियोजनशून्य कारभार; सुस्थितीत असलेल्या गाड्या वापराविना गॅरेजमध्ये

पालिकेकडून गाड्यांची देखभाल होत नसल्याची कबुली; जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी परवानगी

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव महापालिकेत नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या जुन्या मात्र सुस्थितीत असलेल्या अनेक गाड्या वापराविनाच गॅरेजमध्ये पडून असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर नव्यानेच महसूल वसुलीसाठी खरेदी केलेली एक गाडीही गेल्या महिन्याभरापासून गॅरेजमध्ये धूळखात पडल्याचं आता समोर आलं आहे.

मडगाव पालिकेने अजूनही आपल्या मालकीच्या गाड्यांची देखभाल नीट न केल्यास या सर्व गाड्या भंगारात काढल्या जातील अशी चर्चा मडगावातील स्थानिकांमध्ये होऊ लागली आहे. गॅरेजमध्ये जवळपास 10 सुस्थितीतील गाड्या वापराविनाच पडलेल्या असल्याचं एका वृत्तसंस्थेनं समोर आणलं आहे.

पालिकेच्या मालकीचे 7 कॉम्पॅक्टर्स आहेत, ज्यापैकी 5 सध्या रस्त्यांवर कार्यरत आहेत. मात्र दोन कॉम्पॅक्टर गॅरेजमध्य धूळखात पडलेले असून एक गायब असल्याची परिस्थिती मडगावात दिसू लागली आहे. यासोबतच पालिकेच्या मालकीच्या 9 रिक्षांपैकी सहा रिक्षा सध्या गॅरेजमध्ये उभ्या आहेत, ज्यातील बहुतांश सुस्थितीत असून वापरायोग्य आहेत. तसंच टाटा -709 च्या आठ गाड्या पालिकेच्या ताफ्यात आहेत, मात्र यातील दोन गाड्या गॅरेजमध्ये पडून आहेत.

पालिकेच्या लाखो रुपयांच्या गाड्या गॅरेजमध्ये उभ्या असल्याने नागरिकांमधून प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. गाड्या टो करण्यासाठी वाहतूक विभागाच्या वापरात असणारं वाहनही गेल्या काही महिन्यांपासून गॅरेजमध्ये धूळ खात पडलं आहे. यासोबतच दोन टँकर, एक रुग्णवाहिकाही सध्या गॅरेजमध्ये वापराविना पडल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या गाड्यांच्या देखरेखीसाठी असलेलं सेंटरही बंद असल्याने गाड्यांची धुलाईही नीट होत नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या पालिकेच्या बैठकीत अभियंत्यांला काही जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी सशर्त परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. पालिकेच्या गॅरेजमध्येही कोणतीही शिस्त नसून सर्वत्र चालू स्थितीतील गाड्याच पार्क करुन ठेवल्याचं चित्र आहे. आपण अभियंत्यासा सर्व गाड्यांचं रेकॉर्ड बुक ठेवण्याच्या सूचना केल्या असून त्यांची सध्याची स्थिती काय आहे याची माहिती मागवल्याचं पालिका अध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Result 2025 Live Update: फेर मतमोजणीतून देखील भाजपच्या पदरी निराशा; दवर्लीत काँग्रेस उमेदवारच विजयी

Goa Tourism: 'पर्यटनावर हडफडे दुर्घटनेचे सावट नाही; परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ', मंत्री खवंटेंचा मोठा खुलासा

Altinho Lyceum Complex: आल्तिनो येथील ऐतिहासिक लायसियम संकुल ‘जैसे थे’! मध्यस्थी केंद्र स्थापन करण्याची याचिका फेटाळली

Canacona: कृषी खात्याच्या प्रयत्नांना यश! काणकोणात वाढले भाजी पिकाचे क्षेत्र; प्रायोगिक तत्त्वावर 12 शेतकऱ्यांना फायदा

Christmas In Goa: गोव्यात पूर्वी 'ख्रिसमस'चे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी गाव एकत्र येत असे, कडाक्याच्या थंडीतील परिचित उब

SCROLL FOR NEXT