Bull Attack :  Dainik Gomantak
गोवा

Bull Attack: गुन्‍हा नोंद; पण पोलिसांना धीरयो आयोजक सापडेनात

Bull Attack: मृत्‍यू गोठ्यातील रेड्यामुळेच; वाझ कुटुंबीय

दैनिक गोमन्तक

Bull Attack: बाणावली येथील धीरयोचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर कोलवा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अज्ञाताविरोधात हलगर्जीपणामुळे मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याचा गुन्‍हा नोंद केला असला तरी धीरयो नेमक्या कुणी आयोजित केल्‍या होत्‍या, याची माहिती कोलवा पोलिसांना मिळालेली नाही.

कोलव्‍याचे पोलिस निरीक्षक थेरन डिकॉस्‍ता यांच्‍याशी संपर्क साधला असता, या धीरयोचे आयोजन कुणी केले होते, याचा शाेध आम्‍ही घेत आहोत. या प्रकरणात एकाचा मृत्‍यू झाल्‍यामुळे हा तपास सूक्ष्‍मपणे करण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

असे जरी असले तरी मृत जेनिटो वाझ याचा भाऊ राेमियो वाझ याने मंगळवारी प्रसार माध्‍यमांशी बोलताना आपल्‍या भावाचा मृत्‍यू धीरयोतील रेड्याने हल्‍ला केल्‍यामुळे नव्‍हे, तर गोठ्यात बांधलेला रेडा उधळल्‍याने झाल्‍याचा दावा केला. मंगळवारी जो व्‍हिडिओ व्‍हायरल झाला, तो बाणावलीचा नसून दुसऱ्याच कुठल्‍या तरी

गुन्‍हा नोंद; पण पोलिसांना धीरयो आयोजक सापडेनात

ठिकाणाचा असावा, असा दावा जेनिटो वाझ यांच्‍या कुटुंबीयांचे सांत्‍वन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी आलेले बाणावलीतील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी केला. हा व्‍हिडिओ कुणी तरी मुद्दाम समाज माध्‍यमांवर प्रसारित केला असावा, असा दावा त्‍यांनी केला. जेनिटो माझा मित्र होता. त्‍याचा मृत्‍यू घराच्‍या गोठ्यातील रेड्याने हल्ला केल्‍यामुळे झाला, असा दावा त्‍यांनी केला.

शिंगावर रक्तच नाही

जेनिटाेचा मृत्‍यू गाेठ्यात बांधलेल्‍या रेड्याने हल्ला केल्‍याने झाला, असा दावा करीत पोलिसांना त्‍याच्‍या कुटुंबीयांनी एक रेडा दाखविला.

मात्र, जेनिटोवर हल्‍ला केला, त्‍या रेड्याची शिंगे सरळ होती, तर या रेड्याची शिंगे अर्धवर्तुळाकार आहेत.

या रेड्याच्‍या शिंगाला रक्‍ताचे डाग नव्‍हते. हल्‍ला केल्‍यानंतर त्‍या रेड्याची शिंगे पाण्‍याने धुतली म्‍हणून ते डाग गेले, असा दावा त्‍याच्‍या कुटुंबीयांनी केल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

धीरयोच्या जागी रक्ताचे डाग

मंगळवारी या दाव्‍याची सत्‍यता पटविण्‍यासाठी काेलवा पोलिस फॉरेन्‍सिक पथकांसह मृताच्‍या घरी गेले असता, त्‍यांना त्‍या गोठ्यात रक्‍ताचे डाग सापडले नाहीत. शिवाय रेड्याच्‍या शिंगांनाही रक्‍त लागलेले दिसले नाही. उलट ज्‍या ठिकाणी धीरयोचे आयोजन केले असा दावा केला जात आहे, त्‍या ठिकाणी काही प्रसार माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी भेट दिली असता तिथे त्‍यांना रक्‍ताचे डाग दिसून आले. मात्र, पोलिसांनी अजून त्‍या जागेवरील नमुने घेतलेले नाहीत. राज्यात सुरू असलेल्या बेकायदा धीरयोला अनेकांचा विरोध आहे. त्यातच जेनिटोचा मृत्यू झाल्याने सरकार धीरयो कायमस्वरुपी बंद करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT