Pink Force: 'पिंक फोर्स' लागू करणारे गोवा हे पहिले राज्य, जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्य आणि कार्य...

Pink Force: महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी गोव्याने 'पिंक फोर्स' सुरू केली आहे
Pink Force
Pink ForceDainik Gomantak
Published on
Updated on

Pink Force: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी महिला, मुले आणि पर्यटकांवरील गुन्हे रोखण्यासाठी गोवा पोलिसदलात 'पिंक फोर्स'ची सुरुवात केली. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी पिंक फोर्स सुरू करण्यात आलेली

Pink Force
Goa Farming: अधिक मोबदला देणारी गोव्यातील शेती पद्धती...

'पिंक फोर्स' लागू करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. सावंत म्हणाले की, पिंक फोर्स सुरुवातीला 11 पोलिस ठाण्यांमध्ये चालु करण्यात आले होते. या दलातील सर्व महिलांना सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षिण दिले गेले होते. महिला, मुले आणि पर्यटकांसाठी पिंक फोर्स चोवीस तास कार्यरत आहे.

तत्कालिन गोव्याचे डीजीपी आयडी शुक्ला यांनी सांगितले होते की, कोणत्याही महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास पिंक फोर्स पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचेल आणि आरोपींना ताब्यात घेईल.

मात्र, पिंक फोर्स गुन्ह्यांच्या तपासात सहभागी होणार नसून गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करेल. "कोणीही 112 किंवा 110 वर डायल केल्यास, पिंक फोर्स 5 मिनिटांत त्या भागात पोहोचेल. पिंक फोर्स समुद्रकिनाऱ्यावर देखील गस्त घालत असतात आणि एखाद्या महिलेने गैरवर्तन किंवा अपघाताची तक्रार केल्यास वैद्यकीय मदत देखील पुरवली जाईल. गोव्यात पर्यटनाला आल्यावर कोणतीही समस्या अथवा अडचण आल्यास तुम्ही कधीही पिंक फोर्सला वरील नंबर वर फोन करू शकता. पिंक फोर्स 5 मिनिटांत तुमच्या मदतीसाठी त्या भागात पोहोचेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com