Vasco in goa without electricity for 21 hours Dainik Gomantak
गोवा

वास्कोत 21 तास वीज खंडित; बायणा, मुरगाव, सडा परिसरातील बत्ती गुल

वास्कोत मार्चपासून गॅस वाहिनीसाठी खोदकाम सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को : शहरात सध्या इंडियन ऑईल व अदानी ग्रुपतर्फे गॅसवाहिनीसाठी खोदकाम सुरू आहे. फा. डॉ. वाझ रस्त्यावर हे काम सुरू असताना बुधवारी रात्री 1 वाजता मुख्य वीजवाहिनी तुटली. त्यामुळे वास्को शहर, मांगोरहील, बायणा, मुरगाव, सडा परिसरातील वीज गायब झाली. तब्बल 21 तासांनंतर गुरुवारी रात्री 10 वाजता वीजपुरवठा सुरू झाला. (Vasco in goa without electricity for 21 hours)

या प्रकाराबद्दल नागरिकांनी वीज विभागासह इंडियन ऑईल कंपनी, अदानी ग्रुपच्या तुघलकी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गॅस वाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वीज खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याबद्दल इंडियन ऑईल कंपनी, अदानी ग्रुपवर वीज विभागाने पोलिसांत तक्रार नोंदवावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

बुधवारी रात्री 1 वाजता वीजवाहिनी तुटल्यामुळे अर्ध्या वास्को शहरासह मांगोरहील, बायणा, मुरगाव, सडा भागातील लोक हैराण झाले. अचानक वीज गेल्याने लोकांनी त्वरित वीज विभागाशी संपर्क साधला. मात्र, वीज कुठून गेली, याचा शोध घेताना वीज कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. अखेर बोर्जीस इमारतीसमोरील फा. डॉ. वाझ रस्त्यावर गॅसवाहिनीसाठी खोदकाम करताना वीजवाहिनी तुटल्याचे लक्षात येताच रात्रभर वीज विभागाचे कर्मचारी काम करत होते. पण गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत वीज विभागाला पुरवठा सुरळीत करण्यात यश आले नव्हते.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू

गुरुवारी संपूर्ण दिवस वीज खात्याचे कर्मचारी तसेच गॅस वाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते. वास्को वीज विभागाचे साहाय्यक अभियंता संजय म्हाळसेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी रात्रीपासून वीज केबल दुरुस्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

मुदत संपली, तरीही काम सुरूच

दक्षिण गोवा सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाने गॅसवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यास १५ मेपर्यंत परवानगी दिली होती. मात्र, रस्ता खोदण्याचे काम अजूनही सुरू असल्याने नगरसेवक फ्रेड्रीक हेन्रीक यांनी नाराजी व्यक्त केली. इंडियन ऑईल कंपनी तसेच अदानी ग्रुपला मुरगाव पालिकेने रस्ता खोदकामासाठी परवानगी नाकारली होती, अशी माहिती हेन्रीक यांनी दिली.

वास्कोत मार्चपासून गॅस वाहिनीसाठी खोदकाम सुरू आहे. गेल्या आठवड्यात गॅस वाहिनीसाठी खोदकाम करताना सार्वजनिक बांधकाम खात्याची जलवाहिनी एफ. एल. गोम्स मार्गावर तोडली होती. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. त्यावेळीही लोकांची गैरसोय झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT