Vasco Shigmotsav Dainik Gomantak
गोवा

Shigmotsav: ‘घुमचे कटर घूम'! वास्‍कोत शिमगोत्सवानिमित्त शोभायात्रा; वेशभूषा, रोमटामेळ, चित्ररथ आकर्षण

Vasco Shigmotsav: ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘ओस्सय...ओस्सय’च्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत लहान मुलांनी साकारलेल्या वेशभूषा, रोमटामेळ पथके आणि नेत्रदीपक चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मुरगाव शिमगोत्सव समितीतर्फे रविवारी (ता. १५) येथे शिमगोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘ओस्सय...ओस्सय’च्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत लहान मुलांनी साकारलेल्या वेशभूषा, रोमटामेळ पथके आणि नेत्रदीपक चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले.

सायंकाळी पाचच्या सुमारास सेंट ॲन्ड्र्यू चर्चजवळील हिरालाल ठक्कर हाऊस येथून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते ध्वज दाखवून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, उद्योजक संजय सातार्डेकर, प्रभाकर मुळीक, शेखर खडपकर तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शोभायात्रेच्या सुरुवातीला दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर हेडगेवार विद्यालयाच्या रोमटामेळ पथकाने ढोल-ताशांच्या तालावर विविध सादरीकरणे करून वातावरण उत्साहमय केले. महिला-पुरुष मंडळांसह लहान मुलांनी साकारलेल्या पारंपरिक वेशभूषा आणि विविध व्यक्तिरेखा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. अनेकांनी या कलाकारांसोबत छायाचित्रे व सेल्फी काढत उत्सवाचा आनंद लुटला.

लोकनृत्यांचे सादरीकरण, रोमटामेळ स्पर्धा आणि धार्मिक-सांस्कृतिक विषयांवर आधारित हलते चित्ररथ यामुळे मिरवणुकीची रंगत अधिकच वाढली. रात्री उशिरापर्यंत हजारो नागरिकांनी या भव्य शोभायात्रेचा आनंद घेतला. पूर्वी हा उत्सव केवळ गावापुरता मर्यादित होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारच्या पुढाकाराने तो राज्य व तालुकास्तरावर आयोजित केला जात असल्याने सुमारे पंधरा दिवस संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

लोकनृत्य पथके

शांतादुर्गा शिवरामजमी कला संघ, श्री परशुराम कला क्रीडा संघ पैंगीण, टायटल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल क्लब काणकोण, श्री बेताळ सांस्कृतिक मंडळ पैंगीण, विजया कला मंडळ केळबाय-फोंडा, रामेश्‍‍वर कला संघ होंडा-सत्तरी, ओम नमः शिवाय फोंडा.

रोमटामेळ, चित्ररथ

श्रीराम विश्वकर्मा शिमगोत्सव समिती मुरगाव, श्री नवदुर्गा शिमगोत्सव समिती मडकई, मुरगाव शिगमो समिती सडा, स्वर साई शिगमोत्सव मंडळ म्हापसा, हिंदवी स्वराज्य दिवाडी शिमगोत्सव समिती दिवाडी, श्री चंद्रेश्‍‍वर भूतनाथ शिमगोत्सव मंडळ, त्रिवेणी कला संघ दुर्गाभाट, श्री दत्तात्रय युवक संघ बांदोडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Bicholim Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

SCROLL FOR NEXT