Vasco Market Fire Dainik Gomantak
गोवा

Vasco Market Fire: वास्कोत अग्नितांडव! 88 दुकाने भस्मसात, दोन आगींनी व्यापाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान VIDEO

88 Shops Destroyed in Vasco: वास्को शहरात लागलेल्या दोन भीषण आगीमुळे व्यापारीवर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला. टिळक मैदानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास पहिली आग लागली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: शहरात लागलेल्या दोन भीषण आगीमुळे व्यापारीवर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला. टिळक मैदानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास पहिली आग लागली. वाहनांच्या सुट्या भागांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले, तर जवळ उभी असलेली दोन वाहनेही नुकसानग्रस्त झाली. या घटनेनंतर दुर्दैवाने बुधवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास रविवार बाजारपेठेत दुसरी आग लागली.

या आगीत ८८ दकाने भस्मसात झाल्याची माहिती आहे. रस्त्यावर दुकाने थाटून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना या आगीचा मोठा फटका बसला. दुकानांतील मालासह त्यांच्या उपजीविकेचा आधारही आगीत नष्ट झाला. अनेक जण हतबल होऊन अश्रू ढाळताना दिसले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसांनीही परिस्थिती हाताळली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मंत्री मावीन गुदिन्हो, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि मामलेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही, हे मोठे सुदैव. 66 पा नुकसान दुर्घटनेत झालेल्या सर्व व्यापाऱ्यांना सरकारतर्फे सर्वतोपरी आर्थिक मदत करण्यात पेईल. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पाबद्दल मी देवाचे आभार मानतो."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राखेत हरवली संसाराची स्वप्ने : दुकानातील माल म्हणजे केवळ वस्तू नव्हत्या, तर वर्षानुवर्षांच्या कष्टांचा ठेवा होता. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचे भविष्य या व्यवसायांवर अवलंबून होते. आज त्याच जागी राख उरल्याने व्यापाऱ्यांचे काळीज पिळवटून निघाले. त्यांच्या अश्रूमधून उद्ध्वस्त झालेल्या संसारांची वेदना व्यक्त होत आहे.

नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न; तरीही आगीची वाढती व्याप्ती : आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग अधिकाधिक पसरत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्रिशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, आगीची वाढती व्याप्ती पाहता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण वास्को शहरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गुरुवारी ग्रहांची कृपा, 'या' 4 राशींचे नशीब पालटणार! अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, नोकरीत मिळू शकते मोठी जबाबदारी

Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

DA Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत चार बडे निर्णय

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

SCROLL FOR NEXT