ICC ODI Rankings: वनडे रँकिंगमध्ये मोठा फेरबदल! शुभमन गिल आणि विराट कोहलीची बादशाहत कायम, रोहित-श्रेयसला झटका

Shubman Gill Retains Number 1 ODI Ranking: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत विश्रांती घेतल्यानंतरही 806 रेटिंग गुणांसह त्याचे शीर्षस्थान पूर्णपणे अबाधित आहे.
rohit sharma shreyas iyer
rohit sharma shreyas iyerDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ICC ODI Batting Rankings 2026 Update: भारत-न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पार पडलेली पाच सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत मोठा उलटफेर झाला. या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने आपली नंबर-1ची बादशाहत अत्यंत दिमाखात कायम राखली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत विश्रांती घेतल्यानंतरही 806 रेटिंग गुणांसह त्याचे शीर्षस्थान पूर्णपणे अबाधित आहे.

त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 778 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी असून दोघांमध्ये 28 गुणांचे अंतर आहे. भारतीय संघाचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 757 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, जरी या मालिकेत त्याला हवी तशी चमक दाखवता आली नसली तरी क्रमवारीत कोणताही मोठा धक्का त्याला बसला नाही.

rohit sharma shreyas iyer
ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

या क्रमवारीत अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान 752 गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला, तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन वेळा शून्यावर बाद होणाऱ्या रोहित शर्माला मोठा फटका बसला. तो 732 गुणांसह पाचव्या स्थानी घसरला. याशिवाय, न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या श्रेयस अय्यरला सुमार कामगिरी नडली असून, तो 18 व्या स्थानावरुन थेट 595 गुणांसह 23व्या स्थानी पोहोचला.

rohit sharma shreyas iyer
ICC ODI Rankings: बाबर आझमची बादशाहत संपुष्टात, टीम इंडियाचा 'प्रिन्स' वनडे क्रमवारीत नंबर 1

इतर खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप सहाव्या स्थानी पोहोचला असून इंग्लंडचा बेन डकेट सातव्या स्थानी आहे. टॉप-10 मध्ये पाकिस्तानचा बाबर आजम, इंग्लंडचा जो रुट आणि श्रीलंकेचा कुसल मेंडिस यांना फायदा झाला असून, मेंडिस 10व्या स्थानी तर इंग्लंडचा टॉम बेंट 628 गुणांसह थेट 13व्या स्थानी पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.