

IPL Auction Date Announced: आयपीएल 2027च्या हंगामापूर्वी सर्व दहा फ्रँचायझींनी आपल्या संघातील काही खेळाडूंना रिलीज केले असून, आता सर्व संघांचे लक्ष आगामी खेळाडूंच्या लिलावावर केंद्रित झाले आहे. यासंदर्भातील उत्सुकता ताणली गेलेली असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृत घोषणा करत IPL 2027च्या लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर केले.
गेल्या काही वर्षांपासून आयपीएलचा लिलाव परदेशात आयोजित केला जात होता, परंतु यावेळेस बीसीसीआयने हा बहुप्रतिक्षित सोहळा भारतातच घेण्याचा मोठा निर्णय घेतला, त्यानुसार आगामी 16 डिसेंबर रोजी गोव्यात (Goa) या भव्य लिलावाचा सोहळा रंगणार आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, लिलावाची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरु होईल. सर्व 10 संघांनी आपली रिटेंशन लिस्ट जाहीर केल्यानंतर आता या लिलावात एकूण 66 रिक्त स्लॉट्ससाठी बोली लावली जाणार आहे, ज्यामध्ये 25 परदेशी खेळाडूंच्या जागांचा देखील समावेश आहे.
सर्व फ्रँचायझींकडे मिळून एकूण 297.95 कोटी रुपये उपलब्ध असून, लिलावात कोणत्या खेळाडूंवर कोटींची उधळण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपलब्ध पर्सनुसार, लखनौ सुपर जायंट्सकडे 47.45 कोटी, कोलकाता नाइट रायडर्सकडे 41.65 कोटी, तर सनराइजर्स हैदराबादकडे 40.15 कोटी रुपयांचा मोठा फंड शिल्लक आहे.
याशिवाय, दिल्ली कॅपिटल्सकडे 39.50 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 32.60 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 28.05 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 27.05 कोटी, पंजाब किंग्सकडे 18.60 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 14.15 कोटी आणि गुजरात टाइटन्सकडे 8.75 कोटी रुपये उपलब्ध आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा थरार टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि मोबाईलवर जिओहॉटस्टार ॲपवर लाईव्ह पाहता येणार आहे, मात्र एकाच दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आणि आयपीएलचा लिलाव दोन्ही एकत्र असल्याने चाहत्यांना द्विधा मनस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.