Cipla Company  Dainik Gomantak
गोवा

Cipla Company : सिप्ला कंपनीविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Cipla Company Employees' Agitation : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीचे मशीन दुरुस्तीसाठी ‘एलिव्हेटर पिट’मध्ये उतरल्यावर गुदमरून मरण पावलेले अक्षय भीमराव पवार (२४) व अक्षय विठ्ठल पाटील (२७) यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, सिप्ला कंपनीच्या धोरणाविरोधात पणजीत आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. सिप्ला कंपनीच्या सुमारे तीनशे कामगारांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले.

गेल्या दोन वर्षापासून कंपनी सतावणूक करत असल्याचा आरोप कामगारांनी केला. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आसाम, सिक्कीमसारख्या राज्यात कर्मचाऱ्यांची बदली केली जात असून हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी

केली.

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीचे मशीन दुरुस्तीसाठी ‘एलिव्हेटर पिट’मध्ये उतरल्यावर गुदमरून मरण पावलेले अक्षय भीमराव पवार (२४) व अक्षय विठ्ठल पाटील (२७) यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अंतिम अहवाल देण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.

मृत्यूच्या कारणाबाबत अंतिम अहवाल देण्यासाठी व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रलंबित ठेवण्यात आला आहे. गुदमरण्यासंबंधी काही गोष्ट दिसून आल्या आहेत. अंतिम अहवालानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. बॉयलर व फॅक्टरीच्या निरीक्षकाकडून येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा वेर्णा पोलिस करीत आहेत.

कर्मचाऱ्यांनी बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई शुक्रवारी अधिवेशनात उपस्थित केला होता. एका कर्मचाऱ्याने पत्र लिहून त्यांना याबाबत माहिती दिल्याचा उल्लेख सरदेसाईंनी सभागृहात केला होता. कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अशाप्रकारे परराज्यात बदली केली जात असल्याचे प्रकार कंपनी करत असल्याचे सरदेसाईंनी सभागृहात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

Chimbel Protest: ..भूमिपुत्रांना अवसर येतो तेव्हा त्यांच्यात ‘राखणदार’ अवतरतो! चिंबलवासियांचा लढा आणि तोयार तळे

Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

"गोव्याचे पर्यावरण, वन संवर्धनासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करु"! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गोवा वन विविधता महोत्सवा’चे उद्‌घाटन

वरिष्ठ अभियंत्याला भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून वाचवण्याचा डाव? 350 कोटींचे घोटाळे रडारवर; ‘युनायटेड गोवन्स'ची सीव्हीसीकडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT