VIDEO: टीसीपी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; आमदार विरेश बोरकर आणि पोलिसांमध्ये झटापट, आंदोलकांना फरफटत काढलं बाहेर

Goa TCP Act Section 39A protest: गोव्यातील नगर नियोजन कायद्याच्या (TCP) कलम ३९ (अ) वरून सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.
Goa TCP Act Section 39A protest
Goa TCP Act Section 39A protestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील नगर नियोजन कायद्याच्या (TCP) कलम ३९ (अ) वरून सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. पाळे-शिरदोणमधील प्रस्तावित झोन बदलाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. नगर नियोजन कार्यालयात शुक्रवारी रात्रीपासून ठिय्या मांडून बसलेल्या ग्रामस्थांना आणि सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यालयाबाहेर काढले. या कारवाईमुळे परिसरात तणाव वाढला असून संपूर्ण गोव्यात याचे पडसाद उमटत आहेत.

रात्रभर ठिय्या आणि एका वृद्धेची खालावलेली प्रकृती

शुक्रवारी सकाळपासूनच पाळे-शिरदोण येथील ग्रामस्थ आपल्या मागण्यांसाठी टीसीपी कार्यालयात दाखल झाले होते. "जोपर्यंत झोन बदलाचे अन्यायकारक आदेश रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही," असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.

आंदोलक रात्रभर कार्यालयातच थांबले होते. मात्र, रात्री उशिरा आंदोलनात सहभागी असलेल्या एका वृद्ध महिलेची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आंदोलकांमध्ये प्रशासनाविरुद्ध अधिकच रोष निर्माण झाला.

Goa TCP Act Section 39A protest
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

शनिवारी सकाळी आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करत प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी बळाचा वापर करण्याचे ठरवले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली.

Goa TCP Act Section 39A protest
Goa Marathi Natyaspardha: '..असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल'; निकालांवरच प्रश्नचिन्ह?

महिला आणि पुरुषांना पोलिसांनी अक्षरशः खेचून आणि फरफटत कार्यालयाच्या इमारतीबाहेर काढले. लोकप्रतिनिधी विरेश बोरकर यांनाही पोलिसांनी बाहेर काढल्याने लोकशाहीच्या मूल्यांचा पायमल्ली होत असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com