Road Safety Campaign Gomantak Digital Team
गोवा

Road Safety Campaign : वाहतूक नियमांचे पालन करा!

रोलॅंड मार्टिन ः वास्कोत रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Road Safety Campaign : राज्यात अपघातांचे सत्र सुरू असून प्रत्येक दिवशी कुठे न कुठे अपघात घडत आहेत. गेल्या चार महिन्यात राज्यात 134 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांवर नियंत्रणासाठी जनजागृतीबरोबरच वाहतूक नियमांचे पालनही करायला हवे.अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका व पंचायतीने अपघातांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी त्याचा वार्षिक अहवाल करावा, असे मत गोवा कॅनचे निमंत्रक रोलॅंड मार्टिन यांनी व्यक्त केले आहे. वास्को येथे रस्ता सुरक्षा मोहिमेत बोलत होते.

वास्‍कोच्‍या नगरपालिका इमारतीजवळ आणि दिवाणी न्यायालय वास्‍कोसमोरील ७ व्‍या यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023 चा भाग म्हणून गोवाकॅन आणि पोलिस तसेच ट्रॅफिक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता कृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस व गोवा कॅनतर्फे जागृती करण्यात आली. यावेळी पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, सलिम शेख, रोलंड मार्टिन्सनगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, नगरसेवक, वाहतूक पोलिस व इतर उपस्थित होते. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मार्टिन म्हणाले, राज्यात अपघातांची संख्या वाढत असून ही समस्या गंभीर आहे. रविवारी राज्यात दोन भीषण अपघात झाले. त्यात म्हापशातील एक व साकवाळ येथील एक युवक ठार झाला आहे. या अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी किती वाहन चालक, किती पादचारी, किती प्रवासी कोण कोणत्या ठिकाणी अपघातात मृत झाले आहे. ही सर्व माहिती वेळेसहित पालिका व पंचायतीकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.

अपघात टाळण्यासाठी सर्व चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सरकारनेही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी चालकात जागृती केली पाहिजे. शिवाय सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध केली पाहिजे. समितीचे पदाधिकारी व सदस्य चर्चा करून उपाययोजना सुचवतील, त्या उपाययोजनांची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल. वाहतूकविषयक नियमांचे फलक उभारणे, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सुरळीत ठेवणे आदींवर संबंधी चर्चा करण्यात आली, अशी माहिती सलिम शेख यांनी दिली.

जनजागृती करणार

आगामी काळात राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये नगरसेवक, नगरसेविकांना सहभागी करून लोकांमध्ये रस्ता सुरक्षेसंबंधी जागरूकता निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती गोवा कॅनवे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी दिली होती. रस्ता सुरक्षा समितीने सुचविलेल्या उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी सलिम शेख यांनी सांगितले.

रस्ता सुरक्षा समितीत मान्यवर

बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहने हाकणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, सिग्रल्स तोडणे यासंबंधी दंडात्मक कारवाई करण्यात येते.नागरिकांध्ये वाहतूक सुरक्षासंबंधी जागरुकता होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा समिती निवडण्यात आली आहे. त्या समितीमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींचा तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींचीही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT