Goa Scam Dainik Gomantak
गोवा

Fake Bank Officer: 'मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड केले, झटक्यात 2 लाख रुपये उडाले'; खोट्या बँक अधिकाऱ्याकडून एकाची फसवणूक

Fake Bank Officer Scam Goa: संबंधिताने स्वतःला बँक अधिकारी असल्याचे सांगत खात्याशी संबंधित काही तांत्रिक अडचण असल्याचे कारण पुढे केले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को येथे सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बँक अधिकारी असल्याचे भासवून बनावट मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करत एका व्यक्तीकडून २ लाख ३० हजार ९४८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंडवेल येथील रहिवासी महादेव तांडेल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२८ वाजण्याच्या सुमारास तांडेल यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने स्वतःला बँक अधिकारी असल्याचे सांगत खात्याशी संबंधित काही तांत्रिक अडचण असल्याचे कारण पुढे केले. ती समस्या दूर करण्यासाठी त्याने एक मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. विश्वास संपादन करत त्याने एक एपीके फाइल पाठवली आणि ती तत्काळ डाऊनलोड करण्याचा आग्रह धरला.

तांडेल यांनी ती फाइल डाऊनलोड करताच काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २,३०,९४८ रुपये डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि पोलिसांत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड करण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT