Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

Matrimonial site fraud in Goa: इंदिरानगर-चिंबल येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने एका नामांकित मॅट्रिमोनिअल साईटवर आपली नोंदणी केली होती. २९ जानेवारी २०२६ रोजी तिची ओळख एका व्यक्तीशी झाली.
Matrimonial site fraud in Goa
Goa Matrimonial FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आजच्या डिजिटल युगात विवाह जुळवणी संकेतस्थळे (Matrimonial Sites) जोडीदार शोधण्यासाठी सोयीची ठरत असली, तरी ती सायबर भामट्यांचे मुख्य केंद्र बनत चालली आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार गोव्यातील चिंबल येथे उघडकीस आला असून, एका ३९ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मैत्रीचा बनाव आणि पार्सलचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर-चिंबल येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने एका नामांकित मॅट्रिमोनिअल साईटवर आपली नोंदणी केली होती. २९ जानेवारी २०२६ रोजी तिची ओळख एका व्यक्तीशी झाली. या आरोपीने आपण लंडनमध्ये स्थायिक असून प्रतिष्ठित व्यावसायिक असल्याचे भासवले. काही दिवसांच्या संवादामुळे पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने "तुझ्यासाठी मौल्यवान दागिने, सोने (Gold) आणि रोख रक्कम असलेले एक महागडे कुरिअर पार्सल पाठवत आहे," असे सांगितले.

Matrimonial site fraud in Goa
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

कस्टम्स अधिकारी बनून लुबाडणूक

काही वेळातच महिलेला दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन आले. त्यातील एकाने आपण कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी तर दुसऱ्याने दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क (कस्टम्स) अधिकारी असल्याचे सांगितले. "तुमच्या नावावर एक परदेशी पार्सल आले असून, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आणि सोने असल्याने ते जप्त करण्यात आले आहे. ते सोडवण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि कस्टम ड्युटी भरावी लागेल," असे तिला सांगण्यात आले.

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि कारवाईच्या भीतीपोटी महिलेने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर यूपीआय (UPI) द्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १,३९,००० रुपये पाठवले.

Matrimonial site fraud in Goa
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव

पैसे पाठवल्यानंतरही पार्सल मिळाले नाही आणि संबंधित व्यक्तींनी अधिक पैशांची मागणी सुरूच ठेवली. संशय आल्याने महिलेने चौकशी केली असता, तिची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिने त्वरित जुने गोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. जुने गोवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, सायबर सेलच्या मदतीने आरोपींच्या बँक खात्यांचा आणि फोन नंबरचा मागोवा घेतला जात आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com