Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Sakshi Kale Para Athletics Goa: गतवर्षी पॅरिसमधील जागतिक आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत लक्षवेधी ठरलेली गोव्याची आघाडीची ॲथलिट साक्षी काळे हिचे आर्थिक गणित सध्या बिघडले आहे.
Sakshi Kale Para Athletics Goa
Sakshi KaleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गतवर्षी पॅरिसमधील जागतिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लक्षवेधी ठरलेली गोव्याची आघाडीची ॲथलिट साक्षी काळे हिचे आर्थिक गणित सध्या बिघडले आहे. भविष्यात ट्रॅक अँड फिल्डमध्ये मोठी भरारी घेण्यासाठी तिला मदतीची अपेक्षा आहे. बंगळूर येथे होणाऱ्या आगामी स्पर्धेत पदक जिंकल्यास ती यावर्षी होणाऱ्या आशिया पॅरा गेम्समध्ये चमक दाखवू शकते.

साक्षी पॅरा ॲथलेटिक्समधील गोव्याची सध्याची एकमेव सक्रिय खेळाडू आहे. ती येत्या २५ ते २८ मे या कालावधीत बंगळूर येथे होणाऱ्या आठव्या इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेणार आहे. ७५ टक्के दृष्टिदोष असलेली साक्षी या स्पर्धेतील टी-१३ प्रकारात ४०० मीटर व १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेईल.

Sakshi Kale Para Athletics Goa
Goa Sport: स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी; बीसीसीआयच्या मोहाली येथील ‘सीओई’ शिबिरासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती

सध्या साक्षीला पुरस्कर्त्याचे पाठबळ नाही, त्यामुळे स्पर्धा सहभाग, सराव, निवास व इतर खर्च आदींचे गणित जुळविताना तिला बरीच कसरत करावी लागत असल्याची माहिती सूत्राने दिली. मागे राज्यात कार्यरत असलेल्या एका उद्योगसमूहाने तिच्या कारकिर्दीला हातभार लावला होता; पण तो करार संपुष्टात आल्यामुळे साक्षीची कारकीर्द हेलकावे खात आहे.

सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, की साक्षी खूपच प्रतिभावान आहे. देशातील इतर राज्यांतील पदकविजेते पॅरा ॲथलिट्स कारकिर्दीवर पूर्ण लक्ष एकाग्र करून आहेत; कारण त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. गोव्यात एकदम प्रतिकूल चित्र आहे. त्यामुळे प्रचंड गुणवत्ता असूनही साक्षीला आर्थिक धक्के बसत आहे. राज्य सरकारकडून पदक विजेत्या रोख बक्षीस रक्कम मिळते; पण ती इतर राज्यांच्या तुलनेत खूपच तुटपुंजी आहे. 

Sakshi Kale Para Athletics Goa
Mayem Sport Ground : मयेत क्रीडा मैदानाचा कायापालट; आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामास प्रारंभ

प्राप्त माहितीनुसार, बंगळूरमधील स्पर्धेसाठी एका स्पर्धकास प्रवेश शुल्क तीस हजार रुपये आहे. शिवाय प्रवास, निवास खर्चही आहे. पुढील टप्प्यात साक्षी आशियाई, तसेच जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यास एकंदरीत खर्च लाखो रुपये असेल. त्यामुळे तिला भक्कम पुरस्कर्त्याची नितांत गरज अपेक्षित आहे.

रस्ता अपघातानंतर पुन्हा सज्ज

मागे फुटबॉल खेळताना साक्षी काळे हिला जबर दुखापत झाली होती, त्यातून सावरत तिने पॅरिसमधील स्पर्धा सहभागापर्यंत भरारी घेतली होती. यावर्षी जानेवारीत तिला बाईक अपघातात तिला खूपच मार बसला. मागे बसलेली साक्षी स्पीडब्रेकरवरील अपघातात खाली पडली. जखमांवर बरेच टाके घालावे लागले होते. मात्र, त्या अपघातातून ती आता पूर्णपणे सावरली असून बंगळूरमधील स्पर्धेसाठी पदक जिंकण्याच्या जिद्दीने सज्ज झाली आहे.

Sakshi Kale Para Athletics Goa
Goa Sport Department: क्रीडामंत्र्यांच्या सल्लागाराची अखेर उचलबांगडी; आदेश जारी

साक्षी काळेची २०२५ मधील सफल वाटचाल

  • २३व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्समध्ये १०० मीटरमध्ये सुवर्ण, २०० मीटरमध्ये सुवर्ण,  लांबउडीत रौप्य

  • नवी दिल्ली येथील जागतिक पॅरा ग्रांप्री ॲथलेटिक्समध्ये १०० मीटरमध्ये रौप्य

  • नवी दिल्ली येथील दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये १०० मीटरमध्ये सुवर्ण

  • बंगळूर येथील सातव्या इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत  टी-१३ प्रकारात २ ब्राँझपदके, १०० मीटर व १५०० मीटर

  • पॅरिस येथील जागतिक आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्समध्ये ४०० मीटर शर्यतीत अव्वल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Press Conference
Swapnil Asnodkar BCCI coach
Goa Government Employee Relief
Bicholim Land Fraud Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com