Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

Fuel Shortage Rumors Goa: पंट्रोल पंपवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे संभ्रम वाढला आहे; परंतु राज्यात पंधरा दिवस पुरेल एवढा मुबलक साठा असून इंधनपुरवठा सुरळीत आहे.
 Fuel Shortage Rumors Goa
Fuel Shortage Rumors GoaDainiak Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पंट्रोल पंपवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे संभ्रम वाढला आहे; परंतु राज्यात पंधरा दिवस पुरेल एवढा मुबलक साठा असून इंधनपुरवठा सुरळीत आहे. मात्र, सध्याची युद्धाची स्थिती पाहता पेट्रोल तसेच इतर इंधनांचा वापर आवश्‍यकतेनुसार करणे गरजेचे असल्याचे गोवा पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अधिक इंधनाचा हव्यास टाळा :

अनेकदा टाकी भरली असतानाही काहीजण गाडी हलवून आणि इतर प्रकारे अधिक पेट्रोल किंवा डिझेल गाडीत भरण्याचा प्रयत्न करतात; परंतु अशाप्रकारे कधीच इंधन भरता कामा नये. अशा रितीने भरलेले पेट्रोल बाष्पीकरण किंवा इतर प्रकारे वाया जाते. हा प्रकार ग्राहकांनी करू नये, असे आवाहन पद्मा कामत यांनी केले.

 Fuel Shortage Rumors Goa
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात

रात्रपाळीस कर्मचाऱ्यांचा नकार

गौरीश धोंड म्हणाले, की आमचा करंझाळे येथील पंट्रोल पंप २४ तास सुरू असतो. काही दिवसांपूर्वी सकाळी चार-पाचजण गाड्या घेऊन पेट्रोल पंपवर आले आणि एकाने टाकी फूल्ल करायला सांगितली. एकूण ६१५ रुपयांचे पेट्रोल घातले. पण माझ्या वाहनात इतक्या रुपयांचे पेट्रोल जाऊच शकत नाही, अशी हुज्जत घालून कर्मचाऱ्याला मारहाण करत दीडशे रुपये टाकून ते पळून गेले.

त्या सर्वांना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडल्यावर त्यांचे पालक आले आणि त्यांना सोडविण्याची विनंती करू लागले. मात्र, समाजात योग्य संदेश जावा, यासाठी आम्ही ही कठोर भूमिका घेतली. परंतु आता स्थिती अशी आहे की, पेट्रोल पंपवर कोणीही कर्मचारी रात्रपाळी करण्यास तयार नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Bhandari Community Politics
Goa Assembly Election 2027
E20 Petrol Problems Goa
E20 Petrol Impact Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com