गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

Maharashtra Tourist Arrested Goa: दक्षिण गोव्यातील आरोशी समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी महाराष्ट्रातील एका पर्यटकावर गुन्हा दाखल केला.
Maharashtra Tourist Arrested Goa
Maharashtra Tourist Arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दक्षिण गोव्यातील आरोशी समुद्रकिनाऱ्यावर (Arrosim Beach) बेदरकारपणे गाडी चालवून पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी महाराष्ट्रातील एका पर्यटकावर गुन्हा दाखल केला. मंगळवारी (12 मे) संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली. संशयित आरोपीची ओळख राशिदबेग सादिकबेग इनामदार (26, रा. इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र) अशी पटली. आरोपीने आपली चारचाकी गाडी थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत नेली आणि तिथे अत्यंत वेगाने व निष्काळजीपणे चालवण्यास सुरुवात केली. या अतरंगी कृत्यामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या आणि समुद्राचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची (Tourist) तारांबळ उडाली. वाळूत अशा प्रकारे वेगाने गाडी चालवणे हे केवळ बेकायदेशीरच नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या जिवावर बेतू शकले असते, असे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra Tourist Arrested Goa
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या या कृत्यामुळे मानवी जीवन आणि वैयक्तिक सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन केल्याने कोणालाही गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 281 आणि 125 अंतर्गत गुन्हा नोंदवला.

Maharashtra Tourist Arrested Goa
CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

गोव्यात (Goa) अलीकडच्या काळात समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्याचे आणि स्टंट करण्याचे प्रकार वाढले आहेत, ज्यावर प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. तरीही काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय कॅरी फर्नांडिस हे वेर्णा पोलीस स्थानकाचे पीआय आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com