Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : समुद्रकिनारी मृत माशांचा खच; रासायनिक पदार्थ सोडल्याने धोका

Vasco News : कंपनीकडून रासायनिक पदार्थ सोडल्याने समुद्री जीव धोक्यात; संघटनांकडून संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, झुआरीनगर येथील मेसर्स प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड (आधीची मेसर्स झुआरी ॲग्रो केमिकल्स लि.)कडून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ सोडण्यात येत असल्यामुळे दांडो-वेळसाव येथील ‘पोईम’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीकडून असा प्रकार घडत असल्याचा आरोप ‘गोयच्या रापोणकारांचो एकवोट’ आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी केला आहे.

वेळसाव समुद्र‌किनारा हा लांब पल्ल्याचा समुद्रकिनारा असून अनेक मच्छीमारी समुदाय या ठिकाणी मासेमारी करून आपली उपजीविका चालवतात. या समुद्रकिनाऱ्याला जोडून वरच्या डोंगराळ भागात मे. प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड ही कंपनी कार्यान्वित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीद्वारे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ सोडत असल्याचे येथील मच्छीमार बांधवांच्या निदर्शनास आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाळे-वेळसावच्या खाडीत आणि दांडो-वेळसाव येथील ‘पोईम’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होत असल्याने येथील मच्छीमारांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, यासंबंधी झुआरीनगर येथील मेसर्स प्रदीप फॉस्फेट्स लि. या कंपनीशी याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करावी

१ ‘गोंयच्या रापोणकारांचो एकवोट’ आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाधित क्षेत्रांना त्वरित भेट देऊन पाणी आणि माशांचे नमुने गोळा करून तपासणी करावी. तसेच समुद्राचे पाणी दूषित करून पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

२ गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीकडून अशाप्रकारचे गुन्हेगारी कृत्य वारंवार घडत असल्याचा आरोप मच्छीमार समाजातील ज्येष्ठांकडून केला जात आहे. तसेच यापुढे आपल्या पर्यावरणाच्या आणि समुदायाच्या व्यापक हितासाठी अशा उल्लंघनाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करून घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT