Sattari Fire Dainik Gomantak
गोवा

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Sattari House Fire: सत्तरी तालुक्यातील ब्रम्हकरमाळी परिसरात एका निवासी घराला लागलेल्या भीषण आगीत घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Sameer Amunekar

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ब्रम्हकरमाळी परिसरात एका निवासी घराला लागलेल्या भीषण आगीत घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना काल रात्री घडली असून, आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला कचाट्यात घेतले होते. या दुर्घटनेत सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र, आगीमुळे संसारोपयोगी साहित्यासह घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

१५ लाखांची हानी

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हकरमाळी येथील रहिवासी गुणवंती हरवळकर यांच्या घराला अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की, घरातील कपडे, कागदपत्रे, फर्निचर आणि इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली.

प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत सुमारे १५ लाख रुपयांची मालमत्ता नष्ट झाली आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत आगीने घराच्या मुख्य भागाचा ताबा घेतला होता.

अग्निशमन दलाची धाव आणि बचाव कार्य

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

आग विझवण्यासाठी पाण्याचा मोठा मारा करण्यात आला. सध्या या घटनेचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून हानीचा अधिकृत आकडा स्पष्ट होणे बाकी आहे.

आगीचे नेमके कारण अस्पष्ट

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे हरवळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT