Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Accidental Deaths In Goa: आमदार विजय सरदेसाई यांनी यासंदर्भातील प्रश्‍‍न विचारला होता. राज्‍यात गतवर्षी किती अपघातांची नोंद झाली? त्‍यात कोणकोणत्‍या प्रकारच्‍या वाहनांचा समावेश होता?
midnight road accident Goa
midnight road accident GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गतवर्षी राज्‍यात झालेल्‍या अपघातांपैकी ७५ टक्‍के अपघात हे निष्‍काळजीपणे वाहने चालविल्यामु‍ळे झालेले आहेत, हे वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारण्‍यात आलेल्‍या लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

गतवर्षी राज्‍यभरात एकूण ५२५ अपघात होऊन त्‍यात ३३५ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे तसेच या अपघातांत रेन्‍ट अ कार, बाईक आणि पर्यटक टॅक्‍सी अशा २७ वाहनांचा समावेश असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी यासंदर्भातील प्रश्‍‍न विचारला होता. राज्‍यात गतवर्षी किती अपघातांची नोंद झाली? त्‍यात कोणकोणत्‍या प्रकारच्‍या वाहनांचा समावेश होता? वाढते अपघात आणि त्‍यातील बळींची संख्‍या रोखण्‍यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? असे प्रश्‍‍न आमदार सरदेसाई यांनी विचारले होते.

midnight road accident Goa
Goa Accident: 'हा माझ्या मुलाला संपवण्याचा कट'! करमळी आंदोलनातील पंचसदस्याचा भीषण अपघात; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

त्‍यावर मंत्री गुदिन्‍हो यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्‍यातून गतवर्षी राज्‍यभर ५२५ अपघात होऊन त्‍यात ३३५ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे दिसून येते. यातील ७५ टक्‍के अपघात निष्‍काळजीपणे वाहने चालवल्‍यामुळे, ३७ अपघात योग्‍य खबरदारी न घेता वाहने चालवण्‍याने झालेले असून, ७१ स्‍वयंअपघात झालेले आहेत, असे आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते.

midnight road accident Goa
Goa Accident: वाहने चक्काचूर, टायर हवेत उडाला! पणजीत मध्यरात्री भीषण अपघात; तामिळनाडूच्या चालकाची 'अल्कोमीटर' चाचणी होणार

दरम्‍यान, राज्‍यातील वाढते अपघात आणि अपघाती मृत्‍यूंवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी वाहतूक पोलिसांना आवश्‍‍यक त्‍या ठिकाणी तैनात केले जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्‍य कारवाई करण्‍यात येत आहे. वाहतूक कायद्याच्या नियमित अंमलबजावणीव्यतिरिक्त वाहन चालकांत वेळोवेळी जागृती केली जात आहे. अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात असून, अपघातप्रवण क्षेत्रे ओळखून ती हटवली जात आहेत, असेही मंत्री गुदिन्‍हो यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com