Sattari Crime Dainik gomantak
गोवा

Sattari Crime: सत्तरी बेकायदा शिकार प्रकरण!! आरोपींची चिंता वाढली; कोठडीत चार दिवसांची वाढ

Sattari Valpoi Hunting Gun Shot Case: शनिवारी (४ डिसेंबर ) परत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे

Akshata Chhatre

वाळपई: पाटवळ-सत्तरी येथे बेकायदेशीररीत्या जनावरांची शिकार तसेच गोळी लागून समद खान (२२) याच्या मृत्यूप्रकरणी बाबू उमर संघार व गाऊस नूर अहमद पटेल यांच्या पोलिस कोठडीत डिचोली न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.

२६ डिसेंबर रोजी संशयितांना यापूर्वी चार दिवसांची पोलिस कोठडी म्हापसा न्यायालयाने सुनावली होती. त्यानुसार सोमवार, ३० डिसेंबर रोजी पुन्हा चार दिवसांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी (४ डिसेंबर ) परत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे.

पाटवळ येथे रात्री दोनच्या सुमारास रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी समद खान (नाणूस) याचा बंदुकीची गोळी घालून मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.

तसेच कार गाडी व शस्त्रे जप्त केली होती. शवचिकित्सेनंतर समद खान याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आणि त्यानंतर नाणूस येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

वाळपईत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

वाळपई सत्तरी येथे बेकायदेशीर शिकारीसाठी निघालेल्या समद खान (२२) याचा गोळी लागून मृत्यू झाला. मृत्यूच्या या प्रकरणानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी परिसरात पाहणीला सुरुवात केली. वाळपई पोलिसांकडून संशयितांच्या घराभोवती तपासणी सुरु झालीच मात्र त्यासोबत पोलिसांनी वाळपई परिसरात केवळ तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्ती घरांची झडती घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT