Sattari Crime: सत्तरी बेकायदा शिकार प्रकरण! संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी

Sattari Valpoi Hunting Gun Shot Case: पाटवळ येथे मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी समद खान (नाणूस) याचा बंदुकीची गोळी घालून मृत्यू झाला होता.
Sattari Crime News
Sattari Valpoi Hunting Gun Shot CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Sattari illegal hunting suspects arrested

वाळपई: पाटवळ, सत्तरी येथे बेकायदा शिकार तसेच गोळी लागून समद खान (२२) या युवकाचा मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले संशयित बाबू उमर संघार व गाऊस नूर अहमद पटेल (म्हाऊस) यांना गुरुवारी दुपारी म्हापसा न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठरी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी संपल्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.

पाटवळ येथे मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी समद खान (नाणूस) याचा बंदुकीची गोळी घालून मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. तसेच कार गाडी व शस्त्रे जप्त केली आहेत.

Sattari Crime News
Sattari: शिकारीसाठी गेला अन् जीव गमावून बसला; बंदुकीची गोळी लागून वाळपईच्या युवकाचा मृत्यू

समदचे पार्थिव दफन

शवचिकित्सेनंतर गुरुवारी संध्याकाळी समद खान याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर नाणूस येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. समद हा मनमिळाऊ स्वभावाचा होता, त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. परंतु शिकारीसाठी गेला असता त्याचा मृत्यू झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. शवचिकित्सेचा अहवाल अजून मिळालेला नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात स्थानिक स्मशानभूमीत त्याचे पार्थिव दफन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com