Ravalnath Devasthan Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Ravalnath Devasthan Valpoi: वेळूस रवळनाथ देवस्थानात महाजनांचा वाद; कालोत्सव बंद

Ravalnath Devasthan Valpoi: बुधवारी गुरव आणि गावकर समाजातील महाजनांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Ravalnath Devasthan Valpoi

वाळपई, वेळूस-वाळपई येथील श्री रवळनाथ देवस्थानात १४ फेब्रुवारीपासून सुरू झालेला कालोत्सव गुरव आणि गावकर समाजातील महाजनांमध्ये पुन्हा वाद सुरू झाल्याने सत्तरीच्या मामलेदारांनी गुरुवारी संध्याकाळी तो बंद करण्याचा आदेश जारी केला. तसेच रवळनाथ मंदिरालाही कुलूप लावले.

वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी कालोत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र, बुधवारी गुरव आणि गावकर समाजातील महाजनांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.

यावेळी सत्तरी मामलेदारांनी पोलिस बंदोबस्तात दोन्ही समाजाच्या महाजनांना मंदिरात तीर्थप्रसाद घालण्यास परवानगी दिली नव्हती, तसेच हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी मामलेदार कार्यालयातील कर्मचारी तैनात केले होते. या वातावरणात पहिल्या दिवसाचा उत्सव झाला.

मात्र, गुरुवारी दुपारी गुरव आणि गावकर यांच्यात पुन्हा वाद सुरू होऊन गावकर समाजातील आठजणांनी गुरव महाजनांपैकी दीपक पांडुरंग गुरव यांना मारहाण केली.

नाटकालाही स्थगिती :

श्री रवळनाथ देवस्थानातील वादाचे हे प्रकरण सत्तरी मामलेदारांकडे गेल्यानंतर मामलेदारांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुरुवारी रात्री होणारे नाटक सादर करण्यास स्थगिती दिली, तसेच वाळपई पोलिसांनी हे प्रकरण वाढू नये म्हणून रवळनाथ मंदिराला कुलूप लावले.

सशर्त जामिनावर मुक्तता

यावेळी वाळपई पोलिसांत दीपक गुरव यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आठजणांना ताब्यात घेतले. त्यात प्रदीप हरिश्चंद्र गावकर, उमेश काशिनाथ गावकर, रामदास रामचंद्र गावकर, लक्ष्मण रघुनाथ गावकर, लाडू शंबा गावकर,

भरत काशिनाथ गावकर, राजाराम सतू गावकर, दुलो गावकर यांना ताब्यात घेतले. या आठजणांना सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT