Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: वाळपईत हॉटेलामध्ये खाद्यपदार्थांवर कात्री, गॅस सिलिंडरचा तुटवडा; सामोसा, कांदा भजी मिळते एकाच वेळी

Valpoi Hotel Food Crisis: शहरात अनेकांचा हॉटेल व छोटेखानी गाडेधारकांचा व्यवसाय आहे. पण, सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस सिलिंडर विक्रीवर मर्यादा आल्याने हॉटेल व्यावसायिकांना खाद्य पदार्थांवरही मर्यादा आणाव्या लागल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: शहरात अनेकांचा हॉटेल व छोटेखानी गाडेधारकांचा व्यवसाय आहे. पण, सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस सिलिंडर विक्रीवर मर्यादा आल्याने हॉटेल व्यावसायिकांना खाद्य पदार्थांवरही मर्यादा आणाव्या लागल्या आहेत. एरव्ही, सकाळ-संध्याकाळ केले जाणारे जीभेचे चोचले पुरविणारे पदार्थ बनविण्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्यस्थितीत वाळपईतील हॉटेलात खाद्य पदार्थांवर हॉटेल मालकांनी कात्री लावली आहे.

सकाळी वडा केला तर सायंकाळी नाही; सामोसा, कांदा भजी, मिरची भजी, बटाटा काप, मिसळ भाजी, पातळ भाजी, मिक्स भाजी असे खाद्य पदार्थ एकवेळच केले जात आहेत. त्यामुळे एखादा पदार्थ सकाळी मिळतो, पण सायंकाळी मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गोड पदार्थांमध्ये भक्कम पेढा तयार करणे काहींनी बंद केले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल मालकांनी पदार्थ बनविण्यात स्वतःच नियंत्रण आणले आहे. त्यामुळे रोजच्या ग्राहकांनाही आवडते पदार्थ दररोज मिळेनात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ब्लॅक सिलिंडर विक्रीवर कारवाई व्हावी...

वाळपई शहरात ब्लॅक सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत. खास करून व्यावसायिक गॅस सिलिंडर ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्याची किंमत दोन ते तीन हजारांपर्यंत ठेवली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर नियंत्रण येण्याची गरज असून, तरच सर्वांना व्यवस्थित गॅस सिलिंडर मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT