Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : दशावतारी नाटकात सामाजिक संदेशही ! अभंगवाणीतून भक्तीचा प्रचार

Valpoi News : या प्रत्येक नाटकात मनोरंजनाबरोबरच लोकांना सामाजिक संदेशही दिला जातो. भक्ती महिमा नारद पात्रातून अभंगवाणीतून सांगितली जाते. असेच एक सामाजिक संदेश देणारे नाटक धावे तार येथे नुकतेच झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, दशावतार नाटक हा कोकणाचा श्वास आहे. अनादी काळापासून ही कला रसिक प्रेक्षकांनी जोपासून ठेवलेली आहे. ही कला जोपासण्यास सत्तरी तालुक्याचेही मोठे योगदान आहे. सत्तरी तालुक्यात दशावतारी नाटके आजही अधिराज करून आहेत.

या प्रत्येक नाटकात मनोरंजनाबरोबरच लोकांना सामाजिक संदेशही दिला जातो. भक्ती महिमा नारद पात्रातून अभंगवाणीतून सांगितली जाते. असेच एक सामाजिक संदेश देणारे नाटक धावे तार येथे नुकतेच झाले.

धावे तार येथे नागदेवता मंदिर स्थापना दिनानिमित्त देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर नाईक दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांचा अजिंक्यमणी या नाटकाचा प्रयोग सादर झाला. त्यात कलाकारांनी बहारदार भूमिका करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यात अनेक विनोदी प्रसंगही होते. भाव अंतरीचे हळवे या गीतावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.

मुलांवर लक्ष ठेवण्याचा संदेश

या नाटकात मनोरंजन झालेच बरोबरच सामाजिक संदेशही लोकांना देण्यात आला. अजिंक्यमणी प्राप्तीसाठी चाललेली खटाटोप हे दाखविण्यात आले. आई वडिलांनी मुलांवर कसे लक्ष ठेवावे हे सांगण्यात आले. आपल्या मुलांवर सतत लक्ष केंद्रित ठेवण्याचा संदेश नाटकातून देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT