Crime News  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Crime News : वाळपईत एकावर बाचाबाचीतून हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

रात्रीची घटना : पोलिसांचा तपास सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : वाळपई येथे रात्री ८ च्या सुमारास एका युवकाने कोपार्डे सत्तरी येथील श्रीपाद सावंत यांच्यावर चाकुने वार केल्याची घटना घडला. जखमी झालेल्यार श्रीपाद याच्यांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपार्डे येथील प्रितेश गावस हे वाळपई वरुन कोपार्डे येथे जात होते. यावेळी वेळुस हनुमान विद्यालयाजवळ समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याला ठोकर दिली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा श्रीपाद यांनी संशयित रहीम खान याला अडविले आणि विचारणा केली. त्यावेळी गाडीत आणखीन तीघे बसले जण होते. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात श्रीपाद यांनी प्रितेश याच्या गाडीचे नुकसान झाले आहे, ते दे आणि नंतर जा असे सांगितले. त्यावर संशयित अंगावर धावुन गेला.

त्यानंतर त्यांनी श्रीपादवर चाकूने हल्ला केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी चाैघांना पोलिस स्थानकांत नेले. यावेळी मोठ्या संख्येंनी नागरिकांची उपस्थिती होती. रहीम हा तरुण वाळपई सय्यदनगर येथील रहिवासी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "जगातील सर्वोत्तम T20 फलंदाज बाहेर कसा?" टीम इंडियाच्या संघ निवडीवर दिग्गज खेळाडू भडकला! पोस्ट होतेय व्हायरल

इतरांशी तुलना नव्हे, स्वतःची ताकद ओळखा; आनंदी जीवनाचा खरा मार्ग

Child Rights Commission: राज्य बालहक्क आयोगावर सरकारची नजर; देखरेख समिती नियुक्त, चौकशी अहवालावर कारवाईची तयारी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात 2.10 फिटमेंट फॅक्टरची चर्चा; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित...

Goa Water Metro: वॉटर मेट्रो सेवा सुरू झाल्यास मांडवी-झुआरी जोडली जाईल! अंतर्गत जलमार्गामुळे पर्यटनाला चालना- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT