Goa Water Metro: वॉटर मेट्रो सेवा सुरू झाल्यास मांडवी-झुआरी जोडली जाईल! अंतर्गत जलमार्गामुळे पर्यटनाला चालना- मुख्यमंत्री

Goa Water Metro Project: राज्यात रो-रो सेवेमुळे सध्यापेक्षा ५ हजार प्रवासी अधिक वाढले आहेत, असे सांगत आगामी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर राज्यात वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे.
Goa Water Metro Project
Goa Water MetroDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात रो-रो सेवेमुळे सध्यापेक्षा ५ हजार प्रवासी अधिक वाढले आहेत, असे सांगत आगामी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर राज्यात वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मांडवी आणि झुआरी या दोन्ही नद्या जलमार्गाने जोडल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. बंदर कप्तान खात्याच्या टर्मिनलच्या उद्‍घाटनाच्यावेळी ते बोलत होते.

नदी परिवहन खात्याकडून वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याशिवाय त्याचा आराखडाही तयार केला असून, ही मेट्रो लवकरात लवकर सुरू होणे राज्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa Water Metro Project
Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

या प्रस्तावित प्रकल्पाचा उद्देश गोव्यातील नद्या आणि जलमार्गांच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून संपर्क व्यवस्था सुधारणे, पर्यावरणास पूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. तसेच, या वॉटर मेट्रोमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि राज्यातील विविध भागांमधील प्रवासाची सुविधा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, कार्यक्रमानंतर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे मच्छीमारांवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण ही सेवा राज्यातील किनारपट्टीवरील मार्गांवर चालवली जाईल. या प्रणालीमध्ये प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी आणि थांबण्यासाठी निश्चित केलेली स्थानके व रॅम्प्स यांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com