Valpoi News : लोककलाकारांमुळे लोकसंस्कृती जीवंत : अशोक काणेकर

अशोक काणेकर : ज्येष्ठ लोककलाकार सातू माजीक यांचा सन्मान
ashok kanekar statement folk artist still alive satu majik awarded goa
ashok kanekar statement folk artist still alive satu majik awarded goaDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi : गोवा हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. सत्तरी सारख्या ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो.

लोकरंगभूमी विकसित झाली ती फक लोककलाकारांमुळे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान हा झाला पाहिजे, असे प्रतिपादन वाळपई सम्राट क्लबचे अध्यक्ष अशोक काणेकर यांनी केले. सम्राट क्लब वाळपईतर्फे रंगभूमी दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

ashok kanekar statement folk artist still alive satu majik awarded goa
Valpoi News : गोवा मुक्तीनंतरचा 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

झर्मे सत्तरील येथील ज्येष्ठ लोककलाकर श्री सातू माजीक यांचा स्थानिक पंच श्री गुरुदास गावस ह्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम झर्मे येथील सातेरी केळबाय देवस्थान सभागृहात झाला. ह्या सोहळ्यास क्लबचे अध्यक्ष अशोक काणेकर, सचिव चंदन गावस, श्री सुभाष गावस, श्री अंकुश धुरी, श्री संजय हळदणकर व देवस्थानचे पुजारी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com