Court Order, summons  Canva
गोवा

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Prakash Velip: वेळीप यांनी संघटनेच्‍या नावात जरी ‘अलायन्‍स’ शब्द असला तरी काही संघटना एकत्र येऊन स्‍थापलेली ही संस्‍था नव्‍हे, तर १४ व्‍यक्‍तींनी स्‍थापलेली ती सोसायटी आहे, असा दावा केला.

Sameer Panditrao

मडगाव: अनुसूचित जमातीच्‍या अधिकारासाठी लढणाऱ्या आठ संघटनांनी एकत्र येत ‘उटा’ या समाज शिखर संघटनेची स्‍थापना केली, असे सांगण्‍यात येत होते. मात्र, ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांनी संघटनेच्‍या नावात जरी ‘अलायन्‍स’ शब्द असला तरी काही संघटना एकत्र येऊन स्‍थापलेली ही संस्‍था नव्‍हे, तर १४ व्‍यक्‍तींनी स्‍थापलेली ती सोसायटी आहे, असा दावा केला.

‘उटा’ च्‍या कार्यकारिणीत इतर सहकारी संस्‍थांतील सभासदांना स्‍थान दिले नाही आणि या सभासदांना विश्‍वासात न घेता ‘उटा’ची कार्यकारी समिती निवडण्‍यात आली, असा दावा करुन एसटी अधिकार चळवळीत सक्रीय असलेल्‍या सहा संघटनांनी दक्षिण गोवा निबंधकांसमोर ही समिती बरखास्‍त करावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्‍या अर्जाला उत्तर देताना ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप आणि खजिनदार नानू बांदोळकर यांनी निबंधकांना जे लेखी निवेदन दिले आहे त्‍यात या सहा संघटनांचा उटाशी कोणताही संबंध नाही असा दावा केला आहे.

ज्‍या संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे त्‍यांचा ‘उटा’शी कोणताही संबंध नसल्‍याने ही याचिका फेटाळावी, अशी मागणी करताना, याचिकादारांपैकी रवींद्र गावकर, श्रीकांत पालसरकर व गोविंद शिरोडकर हे तिघेजण ‘उटा’चे संस्‍थापक सदस्‍य असले तरी ते कुठल्‍याही संघटनांचे पदाधिकारी म्‍हणून नव्‍हे तर वैयक्‍तिकरित्‍या या संघटनेत होते. मात्र, या तिघांनीही सतत तीनपेक्षा अधिक बैठकांना हजेरी न लावल्‍याने घटनेच्‍या तरतुदीप्रमाणे त्‍यांना संघटनेतून बडतर्फ करण्‍यात आले, असे वेळीप आणि बांदोळकर यांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

सुनावणी

‘गाकुवेध’ फेडरेशन, ऑल गोवा शेड्यूल ट्राईब्‍स युनियन, ट्रायबल वेल्‍फेअर आॅर्गनायझेशन, गौड जमात महासंघ गोवा, तालीगाव ट्रायबल वेल्‍फेअर या संघटना आणि गोमंतक गौड मराठा समाजाच्‍या वतीने समाजाचे सदस्‍य शंकर गावकर यांनी ही याचिका दाखल केली असून दक्षिण गोव्‍याचे निबंधक सूरज वेर्णेकर यांच्‍यासमोर उद्या ४ जुलै रोजी ही याचिका सुनावणीस येणार आहे.

मग ‘अलायन्स’ शब्द आला कसा? याचिकादार

मागच्‍या सुनावणीच्‍यावेळी हे निवेदन देण्‍यात आले होते. त्‍यावेळी या निवेदनाला आक्षेप घेताना वेळीप यांनी चुकीची माहिती सादर केली आहे, असा दावा याचिकादारातर्फे करण्‍यात आला होता. जर वेगवेगळ्‍या संघटना एकत्र येऊन ‘उटा’ ही संघटना स्‍थापन केली नसती तर या संघटनेच्‍या नावात अलायन्‍स हा शब्द का आला असता, असा दावा केला होता. या संघटनेच्‍या घटनेप्रमाणे कुठल्‍याही पदाधिकाऱ्याला सतत दोन टर्मपेक्षा अधिक काळ कार्यकारी समितीवर राहता येत नाही, असे असतानाही प्रकाश वेळीप यांच्‍यासह कित्‍येकजण दोन टर्मपेक्षा अधिक काळ या समितीवर आहेत. ही समिती बेकायदेशीर असल्‍याने ती बरखास्‍त करून त्‍या ठिकाणी प्रशासक नेमावा अशीही मागणी या याचिकेत करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT