UTAA Dispute: 'उटा'ची बेकायदेशीर कार्यकारिणी बरखास्‍त करा! 6 संघटनांचा दावा; प्रकाश वेळीपांसह दोघांना नोटीस

UTAA Executive Notice: ‘उटा’च्‍या विद्यमान समितीविरोधात ज्‍या सहा संघटनांनी आक्षेप घेतला आहे, त्‍यासंदर्भात या तिन्‍ही पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्‍पष्‍ट करावी, असे या नोटिसीत म्‍हटले आहे.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

मडगाव: ‘उटा’चे निमंत्रक गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून डच्‍चू दिल्‍याने या संघटनेच्‍या विद्यमान कार्यकारिणीला जबरदस्‍त धक्‍का बसलेला असताना ही संपूर्ण कार्यकारिणीच बेकायदेशीर असून ती बरखास्‍त करा, असा दावा एसटी समाजाशी संबंधित असलेल्‍या सहा संघटनांनी दक्षिण गोवा जिल्‍हा रजिस्‍ट्रारकडे केला आहे.

तो दाखल करून घेतला असून या प्रकरणात ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांच्‍यासह खास सचिव दुर्गादास गावडे आणि खजिनदार नानू बांदोळकर या तिघांना नोटीस जारी केली आहे.

यासंदर्भात एसटी चळवळीशी संबंधित असलेल्‍या सहा संघटनांनी जिल्‍हा रजिस्‍ट्रार कार्यालयात जो दावा पेश केला होता, त्‍यात ‘उटा’ची विद्यमान समिती बरखास्‍त करून त्‍या जागी प्रशासकाची नेमणूक करावी आणि जाेपर्यंत हा दावा निकाली लागत नाही, तोपर्यंत ‘उटा’चा शिक्‍का आणि अन्‍य कागदपत्रांचा वापर करण्‍यापासून या समितीला प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे.

दक्षिण गोवा जिल्‍हा रजिस्‍ट्रार सूरज वेर्णेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून यासंबंधी २७ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. ‘उटा’च्‍या विद्यमान समितीविरोधात ज्‍या सहा संघटनांनी आक्षेप घेतला आहे, त्‍यासंदर्भात या तिन्‍ही पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्‍पष्‍ट करावी, असे या नोटिसीत म्‍हटले आहे.

या प्रकरणाची सुनावणी मडगावच्‍या जिल्‍हाधिकारी संकुलातील जिल्‍हा रजिस्‍ट्रार कार्यालयात होणार आहे.

Court Order, summons
UTAA: ‘उटा’ संघटनेत उभी फूट, 6 आदिवासी संघटना विभक्त; कार्यकारिणीवरच कारवाईची मागणी

तक्रार दाखल केलेल्‍या संघटनांमध्‍ये गाकुवेध फेडरेशनसह ट्रायबल वेल्‍फेअर असोसिएशन, ऑल गोवा शेड्यूल ट्राईब्‍स युनियन, गौड जमात महासंघ, ताळगाव ट्रायबल वेल्‍फेअर असोसिएशन या संघटनांबरोबरच गोमंतक गौड समाज संघटनेचे सदस्‍य शंकर गावकर यांचा समावेश आहे. ‘गाकुवेध’च्‍या दाव्‍यानुसार, ‘उटा’च्‍या समितीवरील प्रकाश वेळीप, गोविंद गावडे, दुर्गादास गावडे आणि अन्‍य तीन सदस्‍य दोन कार्यकाळापेक्षा अधिक काळ संघटनेवर सलग कार्यरत आहेत.

Court Order, summons
UTAA: ‘उटा’च्या द्विदशकपूर्तीचा नियोजनबद्ध कार्यक्रम! 'राखणदारा'च्या प्रवेशाने उत्साहात भर; युरींची मात्र अनुपस्थिती

समिती बेकायदा असल्याचा दावा

चालू कार्यकाळासाठी प्रकाश वेळीप यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ‘उटा’ची जी विद्यमान समिती निवडली हाेती, ती पूर्णत: बेकायदेशीर असून संघटनेच्‍या घटनेनुसार कार्यकारिणीवर जे सदस्‍य निवडून येतात, ते अन्‍य सहयोगी संघटनांवर पदाधिकारी म्‍हणून निवडून येण्‍याची गरज आहे. शिवाय ज्‍या सदस्‍यांनी सलग दोन कार्यकाळ उटा कार्यकारिणीवर काम केल्‍यास त्‍यांना तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com