Goa Dangerous Spot: गोव्यातील 'हे' ठिकाण ठरते आहे 'धोकादायक', आतापर्यंत चौघांचा बळी; बंदी घालायची होते आहे मागणी

Goa drowning spot ban: लहान मुलांचा बंधाऱ्यावरील वावरही चिंताजनक बनला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, हा बंधारा ‘कर्दनकाळ’ ठरू शकतो.
Goa drowning spot ban
Goa drowning spot banDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली तालुक्यातील वाठादेव येथील बंधारा दिवसेंदिवस असुरक्षित व जीवघेणा ठरत चालला आहे. बांधकाम झाल्‍यापासून आतापर्यंत एका शाळकरी मुलासह चौघांचा बळी या बंधाऱ्याने घेतला आहे. त्‍यामुळे या बंधाऱ्यावर आंघोळीसाठी बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या बुधवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे या बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्‍‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा बंधारा जीवघेणा ठरत असतानाही अधूनमधून, विशेषतः रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी येथे गावाबाहेरील लोकांची मोठी गर्दी दिसून येते.

लहान मुलांचा बंधाऱ्यावरील वावरही चिंताजनक बनला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, हा बंधारा ‘कर्दनकाळ’ ठरू शकतो. त्यामुळे वाठादेव परिसरातील बहुतांश स्थानिक नागरिक या बंधाऱ्यात उतरणे टाळतात.

ग्रामस्थांनी अनेकदा आंघोळीसाठी येणाऱ्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता काही वेळा त्यांच्याकडून दादागिरी केल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे बंधाऱ्यावरील परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डिचोली तालुक्यातील साखळी, कुडचिरे आदी काही ग्रामीण भागात जलस्रोत खात्याने लहान बंधारे उभारले आहेत. यापैकी काही बंधारे नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे आंघोळीसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांपासून वाठादेव बंधारा आंघोळीसाठी ओळखला जाऊ लागला आहे.

Goa drowning spot ban
Goa Tourist Place Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांना बंदी! ग्रामस्थांनी घेतला निर्णय; कचरा, धांगडधिंग्यामुळे ठराव मंजूर

पंपहाऊसमुळे अचानक बदलतो पाण्‍याचा प्रवाह

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येणारा हा बंधारा आंघोळीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी काही ठिकाणी खूप खोल आहे. तसेच ज्या ठिकाणी लोक आंघोळ करतात त्या परिसरात पंपहाऊस असून मोठ्या पाईपद्वारे बंधाऱ्यातील पाणी उपसले जाते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात आणि खोलीत अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Goa drowning spot ban
Adult Content Ban: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' कडून भारतात अडल्ट कंटेंटवर बंदी; केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर इलॉन मस्क यांचे पाऊल

सूचना फलकही झाले गायब

या बंधाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी जलस्रोत खात्याने ‘येथे आंघोळ करू नये’ अशा आशयाचे सूचना फलक लावले होते. मात्र सध्या हे फलकही गायब झालेले आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना धोका असल्याची कल्पना नसते. काहीजण येथे धांगडधिंगा घालत असल्याचेही स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या पार्श्वभूमीवर बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com