Dabolim Airport: गोवा माईल्सचा दरफलक हटला! ‘दाबोळी’वरील वाद; टॅक्सीवाल्यांची मागणी अखेर मान्य

Goa Miles Ratecard: दाबोळी विमानतळावरील गोवा माईल्सच्या काउंटरवरील दरफलक काढावा, ही काळी-पिवळी टॅक्सीमालकांची मागणी अखेर मान्य झाली.
Goa Taxi Demand
Goa Taxi DemandDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी विमानतळावरील गोवा माईल्सच्या काउंटरवरील दरफलक काढावा, ही काळी-पिवळी टॅक्सीमालकांची मागणी अखेर मान्य झाली. शुक्रवारी (ता.६) वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत दर फलक व सरकारी टॅक्सी अ‍ॅप लिहिलेले फलक काढण्यात आले. प्रलंबित मागणी मान्य झाल्याने काळी पिवळी टॅक्सीमालकांच्या युनायटेड टॅक्सीमेन्स संघटनेने आभार मानले.

याप्रसंगी गोव्यातील सर्व प्रकारच्या टॅक्सीवाल्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर यावे, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले. तसेच दाबोळी विमानतळावरील दलालांविरोधात योग्य कारवाई करण्याचे निर्देश दाबोळी विमानतळ पोलिसांना दिले.

दाबोळी विमानतळावर गोवा माईल्स व युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशन यांचे काउंटर आहेत.युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशनाचा प्री-पेड काउंटर आहे.तेथे दरनुसार आगाऊ टॅक्सी भाडे घेतले जाते.

तर गोवा माईल्स अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा देते. तथापि गोवा माईल्सच्या काउंटरवर दरफलक लावण्यात आला आहे. अ‍ॅपवर सेवा असल्याने असा दरफलक लावता येत नसल्याचा दावा ‘युनायटेड टॅक्सीमेन्स’कडून करण्यात येत होता.

तो दरफलक हटवावा, अशी मागणी करण्यात आली होती. गोव्यातील सर्व टॅक्सीमालक, चालक संघटनांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वाहतूक मंत्री गुदिन्होंसमवेत गुरुवारी बैठक झाली होती.

Goa Taxi Demand
Goa Taxi App: 'ॲप आधारित टॅक्‍सी सेवा नको'! पारंपरिक टॅक्सीमालकांची मागणी; मुख्‍यमंत्र्यांनी घेतली प्रतिनिधींसोबत बैठक

त्यात गुदिन्हो यांनी तो फलक शुक्रवारी सकाळी काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. टॅक्सीसेवेच्या नावाखाली दलालांच्या सुळसुळाटाबद्दल मंत्री गुदिन्हो यांनी नाराजी व्यक्त करून दलालांना रोखले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी पोलिस निरीक्षक जॉन फर्नांडिस यांना यासंबंधी निर्देश दिले.

गोवा माईल्सचा दरफलक हटवल्याबद्दल युनायटेड टॅक्सीमेन्स असोसिएशनचे प्रसाद प्रभूगावकर यांनी संघटनेतर्फे मंत्री गुदिन्हो, मुख्यमंत्री डॉ. सावंत व आमदार आमोणकर यांचे आभार मानले.

Goa Taxi Demand
Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

टॅक्सीवाल्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर यावे!

काही लोक टॅक्सीवाल्यांना दराबाबत नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.ते अधिक भाडे आकारतात, हे मी मान्य करीत नाही. एक दोघांसाठी सर्वांना दोष देणे ठीक नसल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. खरे तर काही एअरलाईन्स एजन्सी, काही पंचतारांकित हॉटेलवाले अधिक दर आकारतात. ते बंद होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व टॅक्सीमालक डिजिटल फ्लॅटफॉर्मवर आल्यास समान दर होईल. त्यामुळे अधिक दर आकारण्याचा हा प्रश्नच नष्ट होईल. काही टॅक्सीमालक संघटना डिजिटल फ्लॅटफॉर्मचा का स्वीकारत नाही हे समजत नाही.‘एआय डेटा’मुळे गोव्यात काळी-पिवळी, टूरिस्ट, रेंट अ-कार व फ्रँचायझी किती आहेत ही माहिती मिळेल. त्यामुळे गैरप्रकार थांबेल,असेही गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission
Hyderabad Airport Fake Goa Ticket
Goa Housing Board Home Regularisation
amit palekar slams mauvin godinho
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com