Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar: उत्पल पर्रीकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

Utpal Parrikar: लोकसभा निवडणुकीपूर्वी परततील स्वगृही

Shreya Dewalkar

Utpal Parrikar: माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र, पणजीतील एक प्रबळ राजकीय नेते उत्पल पर्रीकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. लोकसभा निवडणुकीआधी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती दिल्लीतील माहीतगार उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकृतपणे उत्पल यांच्या भाजप प्रवेशाचा आग्रह धरला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही उत्पल हे भाजपमध्ये यायला हवेत अशी भूमिका घेतली होती. त्या साऱ्याचा विचार हा निर्णय घेताना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केला आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्पल यांचा केवळ ७१६ मतांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढताना पराभव झाला होता. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिल्लीत उत्पल यांना पणजीत समर्थन नसल्याची माहिती दिली होती.

असे असताना भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढताना उत्पल यांनी भाजपवर टीका केली नव्हती. आपण भाजपच्या विचारधारेपासून दूर गेलेलो नाही असे जाहीरपणे त्यांनी अनेकदा सांगितले होते. त्याचाही विचार या निर्णयामागे असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपचा गोव्यात विस्तार करण्यास स्व. पर्रीकर यांनी बजावलेली भूमिका, रा. स्व. संघाचे पर्रीकर यांनी गोव्यात केलेले काम यामुळेच भाजप आणि संघातून उत्पल यांच्याकडे आदराने पाहण्यात येत आहे. उत्पल पर्रीकर यांच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते भाजपमध्ये यायला हवेत.

मनोहर पर्रीकरांची राजकीय कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे आणि त्याचे स्मरण भाजपला असायला हवे, अशी प्रतिक्रिया रा. स्व. संघाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने दिली.

बाबूश अस्वस्थ

उत्पल यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे समजताच राज्य पातळीवरील भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या प्रवेशाबाबत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना कुणकुण लागल्याने तेही कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. भाजपच्या सत्ताधारी गोटात मोठी अस्वस्थता आहे. उत्पल पर्रीकरांच्या भाजप प्रवेशामुळे सत्ताधारी गट काहीसा कमकुवत बनेल अशी धास्ती त्यांना वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: ईडीची गोव्यात मोठी कारवाई! 1268 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, शिवशंकर मायेकर टोळीच्या घोटाळ्यावर 'प्रहार'

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

SCROLL FOR NEXT