Usgao Kallapwada JCB accident Dainik Gomantak
गोवा

Ponda: जेसीबी धडकल्याने वीजखांब कोसळले, शॉर्टसर्किटमुळे काजू बागेला आग; वीज खात्याचे दोन लाखांचे नुकसान

Usgao Kallapwada JCB accident: कल्लपवाडा - उसगाव येथे उत्खनन करणाऱ्या जेसीबीचालकाने निष्काळजीपणे वाहन हाकून रस्त्याकडेच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली.

Sameer Amunekar

फोंडा : कल्लपवाडा - उसगाव येथे उत्खनन करणाऱ्या जेसीबीचालकाने निष्काळजीपणे वाहन हाकून रस्त्याकडेच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या धडकेनिशी वीज खांब उन्मळून पडला. मात्र, त्याचबरोबर लगतचे इतर चारही वीज खांब जमीनदोस्त झाले. बुधवारी दुपारी ही घटना घडली.

वीज खांब कोसळल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन रस्त्यालगतच्या काजू बागायतीला आग लागली. त्यात मोहोराला आलेली काजू बागायती भस्मसात झाली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला साधारण ऐशी हजार रुपयांचे नुकसान झाले. आग भडकल्यानंतर फोंड्यातील अग्निशामक दलाला पाचारण केले.

त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. बागायती जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाच खांब उन्मळून पडल्यामुळे वीज खात्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर पळून जाणाऱ्या जेसीबीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

खरी कुजबुज: लवकरच गोव्यात 'रिअल काँग्रेस पार्टी?'

Khelo India Tribal Games: गोवा एकूण चार पदकांसह अठराव्या क्रमांकावर; 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके

FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

SCROLL FOR NEXT