Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

Indore Youth Death in Anjuna Goa: गोव्यातील हणजूण येथील एका प्रसिद्ध क्लबमध्ये पार्टीदरम्यान इंदूर येथील 21 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
Indore Youth Death in Anjuna Goa
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Indore Youth Death in Anjuna Goa: गोव्यातील हणजूण येथील एका प्रसिद्ध क्लबमध्ये पार्टीदरम्यान इंदूर येथील 21 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या किनारपट्टीवरील पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा हणजूण येथील एका क्लबमध्ये पार्टी सुरु असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला.

त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला 'ब्रॉट डेड' घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हणजूण (Anjuna) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) पाठवला. या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Indore Youth Death in Anjuna Goa
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, प्राथमिक तपासात पोलिसांनी हा मृत्यू अत्यंत संशयास्पद असल्याचे मानले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या पार्टीत कोणत्या प्रकारचे पदार्थ सेवन केले गेले होते आणि त्या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत होती का, या दिशेने आता पोलीस तपास चक्रे फिरवत आहेत. संबंधित क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, मृतासोबत असलेल्या मित्रांचीही कसून चौकशी केली जात आहे.

Indore Youth Death in Anjuna Goa
Goa Crime: दुप्पट पैशांचे आमिष अंगलट आले, 16 वर्षीय तरुणाची फसवणूक; अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

गोव्यातील (Goa) हणजूण आणि वागातोर सारख्या परिसरात होणाऱ्या लेट नाईट पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे सेवन ही एक मोठी समस्या बनली आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 21 वर्षांच्या तरुण मुलाचा असा अचानक झालेला मृत्यू इंदूरमधील त्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का ठरला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून जर यामागे ड्रग पेडलर्सचे रॅकेट असल्याचे समोर आले, तर मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे. सध्यातरी पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून या घटनेमुळे गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि अंमली पदार्थांच्या विळख्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com