Khelo India Tribal Games: गोवा एकूण चार पदकांसह अठराव्या क्रमांकावर; 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके

Khelo India Tribal Games 2026 Goa: छत्तीसगडमध्ये झालेल्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत गोव्याला चार पदकांसह पदकतक्त्यात अठरावा क्रमांक मिळाला.
Khelo India Tribal Games
Khelo India Tribal GamesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: छत्तीसगडमध्ये झालेल्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत गोव्याला चार पदकांसह पदकतक्त्यात अठरावा क्रमांक मिळाला. त्यांना एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझपदके मिळाली.

स्पर्धेच्या पदकतक्त्यात एकूण २५ राज्ये-संघराज्यांना स्थान मिळाले. कर्नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. त्यांना एकूण ३८ पदके मिळाली. यामध्ये २३ सुवर्ण, आठ रौप्य व सात ब्राँझपदकांचा समावेश आहे.

Khelo India Tribal Games
FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

गोव्यासाठी सुवर्णपदक महिला गोळाफेकीत चिंबल येथील मानसी कुंकळकर हिने जिंकले. पुरुषांच्या उंचउडीत करमणे-धारबांदोडा येथील वैभव गावकर याला रौप्यपदक मिळाले. नुवे येथील ॲग्नेस फर्नांडिस महिला वेटलिफ्टिंगमधील ६९ किलोगटात ब्राँझपदकाची मानकरी ठरली, तर गोव्याच्या पुरुष फुटबॉल संघाला उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

Khelo India Tribal Games
Goa Unseasonal Rain: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण! शनिवारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी स्पर्धा उपक्रमात गोव्यातील ६२ क्रीडापटूंनी भाग घेतला, सोबत १९ अधिकारी होते. गोव्याचे संघ फुटबॉल, हॉकी, जलतरण, वेटलिफ्टिंग व ॲथलेटिक्स या खेळांत सहभागी झाले होते. गोव्याच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सफल कामगिरीद्वारे मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com