"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Brother acquitted of molestation: सख्ख्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली खटला भरलेल्या २५ वर्षीय युवकाची पणजी येथील ‘पोक्सो’ विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
Brother acquitted of molestation
Brother acquitted of molestation्ोगलगक ुदसोलूोक
Published on
Updated on

पणजी: सख्ख्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली खटला भरलेल्या २५ वर्षीय युवकाची पणजी येथील ‘पोक्सो’ विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पीडित मुलीने न्यायालयात आपली साक्ष फिरवल्याने न्यायालयाने संशयाचा फायदा देत संशयिताला सर्व आरोपांतून मुक्त केले.

पीडित मुलीने ‘स्कॅन गोवा’ संस्थेच्या समुपदेशकासह १३ एप्रिल २०२४ रोजी पणजी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये टोंका, मिरामार येथे आपल्या भावाने आपल्यासमोर विवस्त्र होऊन अश्लील चाळे केले आणि ओढून नेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने तक्रारीत केला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी भावाविरुद्ध आयपीसी कलम ३५४-अ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

Brother acquitted of molestation
Goa Unseasonal Rain: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण! शनिवारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

दरम्यान, खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी पक्षाने पीडित मुलगी, तिचे आई-वडील आणि तपास अधिकारी अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मात्र, पीडितेने आपली साक्ष देताना सांगितले की, रागाच्या भरात तिने तक्रार दाखल केली होती.

आता तिला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही. उलटतपासणीत तिने सांगितले की, तिने केवळ भावाचा चेहरा पाहिला होता, त्याचे शरीर दरवाजाच्या मागे होते. तिने आपल्या मूळ तक्रारीतील अनेक गंभीर आरोप खोटे असल्याचे सांगून फेटाळून लावले. पीडितेच्या पालकांनीही आपल्याला अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचे न्यायालयात सांगितले.

Brother acquitted of molestation
FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

तक्रारदाराकडून असहकार्य

विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी आपल्या निकालात नमूद केले की, तक्रारदाराने सरकारी पक्षाला सहकार्य केलेले नाही. तिने नेमकी घटना काय घडली, हे सांगण्यास नकार दिला असून तिला हे प्रकरण वाढवायचे नाही. त्यामुळे संशयिताचा कोणताही लैंगिक हेतू असल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com