US, Israel Attack Iran Dainik Gomantak
गोवा

US, Israel Attack Iran: मध्यपूर्वेतील तणावाचा विमानसेवेला फटका! गोव्याहून दुबई आणि बहरीनला जाणारी विमानं रद्द

US, Israel attack Iran Update: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष आता विकोपाला गेला असून, त्याचे थेट पडसाद गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर उमटले आहेत.

Sameer Amunekar

Middle East tension flight impact

पणजी: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष आता विकोपाला गेला असून, त्याचे थेट पडसाद गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर उमटले आहेत. पश्चिम आशियातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून दुबई आणि बहारिनसाठी उड्डाण करणारी महत्त्वाची विमाने तातडीने रद्द करण्यात आली आहेत.

युद्धाची ठिणगी आणि विमान वाहतुकीवर परिणाम

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात संयुक्त लष्करी मोहीम उघडल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणने केवळ इस्रायलच नव्हे, तर कतार, कुवेत, बहारिन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे.

या प्रतिहल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियाचे आकाश युद्धक्षेत्रात रूपांतरित झाले आहे. हवाई मार्गावरील धोके लक्षात घेऊन भारतीय विमान कंपन्यांसह जागतिक स्तरावरील एअरलाईन्सनी या क्षेत्रातील आपली सेवा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज पहाटे दाबोळी विमानतळावरून बहारिनसाठी पहाटे ४:३० वाजता सुटणारे विमान आणि सकाळी ७:३० वाजता दुबईसाठी रवाना होणारे विमान रद्द करण्यात आले.

ऐन प्रवासाच्या वेळी ही उड्डाणे रद्द झाल्याने परदेशात नोकरीसाठी जाणारे कामगार आणि पर्यटकांना मोठा फटका बसला आहे. विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. युद्धसदृश परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत या मार्गावरील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य केल्यामुळे या संघर्षाने आता 'महायुद्धाचे' स्वरूप धारण केले आहे. कुवेत आणि यूएई सारख्या व्यापारी केंद्रांवर हल्ले झाल्यामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि हवाई वाहतूक साखळी विस्कळीत झाली आहे.

अनेक विमान कंपन्या आता आपला मार्ग वळवून लांबच्या अंतराने प्रवास करत आहेत, ज्यामुळे इंधनाचा खर्च आणि प्रवासाचा वेळ दोन्ही वाढणार आहे. गोव्यातील पर्यटन व्यवसायावरही या रद्द झालेल्या विमानसेवेचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT