Goa Accident: हणखणेत मोठा अपघात! समोरासमोर 2 ट्रक एकमेकांवर आदळले; एक ट्रक पलटी, पट्ट्यांचा पाटा मोडला

Goa Accident: अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. इब्रामपूर येथून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डांबराची वाहतूक केली जाते.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

हणखणे परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात झाला. इब्रामपूर येथील डांबरीकरण प्रकल्पातून गरम डांबर घेऊन जाणारा एक ट्रक आणि माल खाली करून परत येत असलेला दुसरा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, एका ट्रकचा ताबा सुटून तो पुढे काही अंतरावर जाऊन पलटी झाला.

या अपघातात पलटी झालेल्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकचे दोन्ही टायर तुटून दूरवर फेकले गेले, तसेच मागील भागातील लोखंडी पट्ट्यांचा पाटा देखील मोडून बाजूला पडला. रस्त्यावर डांबराचे अवशेष आणि वाहनांचे तुकडे विखुरले होते.

Goa Accident
Goa Accident: चोर्ला घाटात लॉरी दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू, एक जखमी; 12 तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश

अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. इब्रामपूर येथून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डांबराची वाहतूक केली जाते. अरुंद रस्ता आणि अंधारामुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

Goa Accident
Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात! ट्रकचा चकणाचूर; एकाचा जागीच मृत्यू , दुसरा गंभीर

सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जीवितहानी टळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com