Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: ग्रामसभेत गदारोळ! म्हापसा पोलिस अ‍ॅक्शन मोडवर...

खुलेआम गैरप्रकार : पोलिसांकडून सरपंचांसह ‘त्‍या’ जागांची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

खुलेआम दारु, सिगरेट सेवनासोबत ड्रग्सतस्करीचा विषय पोलिसांकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याच्या आरोपावरुन रविवारी झालेली सडये-शिवोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली होती. पोलिस कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर आज बुधवारी म्हापसा पोलिसांनी स्थानिक सरपंचाची पंचायत कार्यालायत भेट घेतली व त्यानंतर पंचायतीने दाखविलेल्या जागांची पोलिसांकडून संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर कोटपाअंतर्गत कारवाई करण्‍यात आली.

याबाबत म्हापसा पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, सडये-शिवोली पंचायत क्षेत्रातील काही खुल्या जागेत किंवा आडोशाच्या ठिकाणी काही युवक दारु, सिगरेट व अंमलीपदार्थांचे सेवन करतात असा आरोप करण्यात आला.

या विषयावरून ग्रामसभेत वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे आज सरपंचांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच काही जागांवर साध्या वेशात पोलिस नियुक्त करून गस्त वाढविली जाईल. असे प्रकार बंद करण्‍यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मध्यंतरी आम्हाला अशा जागांवर दारूच्या बाटल्यांचा खच तसेच रिकाम्या इंजेक्शन सापडल्या होत्‍या. त्‍यामुळे यापूर्वीच पोलिसांना कळविले होते, असे सडये-शिवोलीच्‍या सरपंच दीपा पेडणेकर यांनी सांगितले.

दोघे संशयित ताब्‍यात; कोटपाअंतर्गत कारवाई

सडये-शिवोली सरपंचांसोबत म्हापसा पोलिसांनी फिल्डवर जाऊन संशयास्‍पद जागांची पाहणी केली. त्यानुसार शेळ-गावसावाडा, सडये-मायणा व आजबाजूच्या परिसरात पाहणी केली. यावेळी दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तंबाखूजन्य पदार्थविक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत (कोटपा) दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक गौरव नाईक, हेड कॉन्स्टेबल उमेश नाईक, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर व इतर कर्मचारी यावेळी उपस्‍थित होते.

खुल्या जागेत तसेच माळरानावर आडोशाला बसून दारू पिणे व इतर गैरप्रकार होत असल्याचे आम्ही वेळोवेळी पोलिसांना लेखी कळविले.

तसेच ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसभेत आवाज उठविला. त्‍याची दखल घेत आज म्हापसा पोलिसांनी येऊन या जागांची पाहणी केली. पंचायत क्षेत्रातील दहा जागांची ओळख पटविली आहे. पोलिसांना या ठिकाणी गस्त वाढविण्यास सांगितले आहे.

- दीपा पेडणेकर, सडये-शिवोली सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT