Mumbai-Goa Special Train: उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने अनेकांची पाऊले गोव्याच्या दिशेने वळायला लागली आहेत. गोव्याला बसच्या तुलनेत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते.
मे महिन्यात प्रामुख्याने मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई - गोवा दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन धावणार असल्याची माहिती दिली आहे.
रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई ते थिवी, गोवा दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने (CR) आधीच 916 उन्हाळी स्पेशल चालवण्याची घोषणा केली आहे.
त्यात 26 गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त उन्हाळी स्पेशल ट्रेनसह, या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची ट्रेनची संख्या 942 होईल.
एक फर्स्ट एसी कम एसी-2 टियर, एक एसी-2 टियर, दोन एसी-3 टियर, 10 स्लीपर क्लास, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 4 जनरल सेकंड क्लास अशी ट्रेनची रचना असेल.
विशेष गाड्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि irctc च्या वेबसाइटवर बुकिंग करता येईल.
26 उन्हाळी विशेष ट्रेनचा तपशील खालीलप्रमाणे
ट्रेन क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 06.05.2023 ते 03.06.2023 पर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी 22.15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता थिवीला पोहोचेल.
तर, ट्रेन क्रमांक 01130 दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी 07.05.2023 ते 04.06.2023 या कालावधीत थिवी येथून 16.40 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 04.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.