Assagao garbage Dainik Gomantak
गोवा

Assagao: आसगाव पठार कचऱ्याच्या विळख्यात; नागरिक संतापले

येत्या काही दिवसात ही समस्या संपेल - म्हापसा नगरपरिषद

दैनिक गोमन्तक

म्हापसा नगरपरिषद (एमएमसी) क्षेत्रातील आसगाव पठार सध्या अस्वच्छतेत गुरफटले आहे. पठारावर असलेले कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामूळे नागरिकांची डोके वाढली असून विलगीकरण न केलेला कचरा टाकल्याबद्दल नागरिकही आता संतापले आहेत. कारण या परिसरात दुर्गंधी पसरली आहेत.

(Unsegregated garbage piles up at Assagao plateau)

म्हापसा नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे कचरा विलगीकरणाचे काम संथगतीने सुरु असून नियमीत असणारे काम विस्कळीत झाले होते. मात्र आता परिषदेने यावर उपाय शोधला असून कचरा विलिगीकरणारसाठी एक यंत्र भाड्याने घेतले आहे. त्यामूळे यापुढे हे काम सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

उपलब्ध माहितीनुसार, गोळा केलेल्या कचऱ्याचे आसगाव पठारावर वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, उत्खनन यंत्राच्या समस्येमुळे गोळा केलेला कचरा आसगाव पठारावर साचला आहे. या ठिकाणी दररोज सुमारे 4 टन कचरा गोळा केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, मिश्र कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या कामगारांची संख्याही कमी झालेली आहे.

परिणामी कचरा वर्गीकरणाचे काम विस्कळीत झाले आहे. आणि साचलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असून, गणेशपुरी-मारणा रस्त्यावर वाहनधारकांना त्रास होत आहे. याबाबत नगराध्यक्षांशी संपर्क साधला असता भाड्याने घेतलेल्या खोदकाम मशीनच्या मदतीने वर्गीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT