Goa Karmal Ghat: बांधकाम विभागाला अखेर जाग; रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली

Goa Karmal Ghat: दक्षिण गोवा उपवनसंरक्षक कार्यालयाकडे रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी मागितली आहे.
Goa Karmal Ghat
Goa Karmal GhatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Karmal Ghat: अरुंद रस्त्यामुळे करमल घाटात पावसाळ्यात अनेक वाहनांना अपघात झाले, तर अनेक अवजड वाहने कलंडली. मात्र, आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हमरस्ता विभागाला जाग आली असून तात्पुरती व्यवस्था म्हणून करमल घाटातील धोकादायक वळणे कापून रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हमरस्ता विभागाच्या काणकोण साहाय्यक अभियंत्यांनी वन खात्याच्या दक्षिण गोवा उपवनसंरक्षक कार्यालयाकडे रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी मागितली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी सोमवारी 3 ऑक्टोबरला उपवन संरक्षकांच्या कार्यालयाला दिले आहे.

Goa Karmal Ghat
Goa: प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत- दिव्या राणे

दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) यांनी करमल घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले आहे. त्याचप्रमाणे सभापती रमेश तवडकर यांनी करमल घाटातील अपघातप्रवण वळणांच्या ठिकाणी तातडीने रस्ता रुंदीकरणाची शिफारस केली आहे.

दरम्यान, या रस्ता रुंदीकरणात करमल घाट क्षेत्रात केवळ सहा झाडे कापावी लागणार आहेत. त्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. माशे ते पोळे सीमेपर्यंत चौपदरी रस्ता बांधणीसाठी 177.35 कोटी रुपये केंद्र सरकारच्या रस्ता मंत्रालयाने मंजूर केले आहे. त्यामुळे अपघातप्रवण करमल घाटातील चौपदरी रस्ता दृष्टीक्षेपात आला आहे.

Goa Karmal Ghat
Green Crackers in Goa: गोव्यातही हरित फटाक्यांचा वापर करण्याचा विचार

बेंदुर्डे ते गुळेपर्यंतच्या सध्याच्या हमरस्त्याशेजारील 14 किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माशे ते पोळेपर्यंतच्या सुमारे 14 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 177.35 कोटी रुपयांची तरतूद 22-23 आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या रस्ता मंत्रालयाने केली आहे.

Goa Karmal Ghat
Dasara Puja 2022: डिचोलीत फुलला 'झेंडूं'चा बाजार

भू-संपादनासाठी हवे वन खात्याचे सहकार्य

हल्लीच मडगाव ते कारवार हमरस्त्यावरील करमल घाटातील गुळे ते बेंदुर्डे चौपदरी रस्त्याच्या भू-संपादनासाठी 79 कोटींची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे भू-संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी अपघातप्रवण क्षेत्रातील रस्ता रुंदीकरणासाठी वन खात्याच्या मालकीच्या जमिनीची सार्वजनिक बांधकाम खात्याला आवश्‍यकता आहे. म्हणजेच आजपर्यंत चौपदरी रस्त्यासाठी भू-संपादन प्रक्रिया झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com