Russia-Goa Flights: गोवा विमानसेवेला रशियाचा हिरवा कंदील

पर्यटन हंगाच्या सुरुवातीला घेतलेला निर्णय गोव्याच्या हिताचा
Goa flights
Goa flightsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात नुकतीच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून अनेक विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाची सर्वात मोठी एअरलाइन असलेल्या 'एरोफ्लॉट' या विमान कंपनीने मॉस्को ते गोवा विमानसेवा सुरु करणार असल्याचं म्हटले आहे. ही विमाने सेवा 2 नोव्हेंबरपासून सुरु होणार.

(Aeroflot to operate 3 Russia-Goa flights)

Goa flights
Goa: प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत- दिव्या राणे

ही विमानसेवा मॉस्को ते गोवा आठवड्यातून तीन वेळा नियोजित केली आहे. एका टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटरने सांगितले की, दोन विमान कंपन्यांसाठी लँडिंगचे स्लॉट मंजूर केले आहेत. "केवळ मॉस्कोच नव्हे तर रशियाच्या विविध भागातून चार्टर्स येतील. या महिन्याच्या अखेरीस कझाकस्तानकडून चार्टर्स अपेक्षित आहेत. असे एरोफ्लॉटचे अधिकारी डायस यांनी स्पष्ट केले.

Goa flights
Goa Karmal Ghat: बांधकाम विभागाला अखेर जाग; रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली

गेल्या हंगामात, गोव्याला रशिया आणि कझाकस्तानकडून चार्टर मिळाले होते, यामध्ये एकूण 7,630 पर्यटक आले होते. संक्षिप्त चार्टर हंगाम डिसेंबर 2021 मध्ये सुरू झाला आणि रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच मार्चमध्ये संपला होता.

2021 मध्ये गोव्याला 33 लाख देशी पर्यटक

देशांतर्गत आगमनाच्या मोठ्या प्रवाहाने उद्योग चांगल्या स्थितीत ठेवला आहे, परंतु संबंधीत व्यापकारी उद्योजकांचे म्हणणे आहे की, लहान हॉटेल्सची नोंद ठेवण्यासाठी चार्टर पर्यटकांची आवश्यकता आहे, कारण या विभागाला गेल्या दीड-दोन वर्षात देशांतर्गत येणा-या वाढीचा फायदा झालेला नाही. अर्धे वर्षे 2021 मध्ये गोव्याला 33 लाख देशी पर्यटक आणि सुमारे 22,000 परदेशी पर्यटक आले होते. हा निर्णय घेतल्याने गोव्याला देखील फायदा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com