Art By Pernem's Namrata Parab Dainik Gomantak
गोवा

पेडणेतील नम्रता परब यांनी जपलीय अनोखी कला; शंख-शिंपल्यांतून मोहक कलाकृतींचा आविष्कार

गेली २८ वर्षे नम्रता परब या हस्तकलेची सेवा करत आहेत.

दैनिक गोमन्तक

प्रकाश तळवणेकर

गोव्याला सुंदर आणि लांबलचक समुद्र किनारा लाभला आहे. येथील किनाऱ्यांवर अनेक रंगीबेरंगी, आकर्षक असे शंख शिंपले सापडतात. खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शिंपल्यांची चव जशी रुचकर असते, तसेच हे शिंपले जर व्यवस्थित मांडले तर याच शंख, शिंपल्यांतून एकाहून एक सरस कलात्मक व सुंदर अशा शोभेच्या वस्तूही तयार होऊ शकतात. याची प्रचीती नम्रता परब यांच्या कलाकृती पाहिल्यास येते.

गेली २८ वर्षे नम्रता परब या हस्तकलेची सेवा करत आहेत. पर्वरी हे त्यांचे माहेर.(त्या पूर्वाश्रमीच्या सविता गावस). शंख-शिंपल्यांपासून कलात्मक वस्तू करण्याची आवड असणाऱ्या सिने अभिनेत्री राधिका मालिक यांच्याकडे मदतनीस म्हणून दहावीपर्यंत शिकलेल्या नम्रता काम करू लागल्या. त्यातूनच नम्रता यांनीही ही कला आत्मसात केली. हस्तकला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नम्रता बनवत असलेल्या वस्तू बघून त्यांच्या कलेचे कौतुक करायचे. त्यातूनच नम्रताला प्रोत्साहन मिळाले.

रामेश्वरमहून येतो कच्चा माल

सुरवातीला नम्रता येथील किनाऱ्यावर जाऊन शंख - शिंपले गोळा करून आणायाच्या.पण आवश्यक संख्येने शंख शिंपले मिळत नसल्याने वेळ व श्रम वाया जायचे. शेवटी त्यांनी तमिळनाडू मधील रामेश्वरम येथून कच्चा माल मागवण्यास सुरवात केली. वस्तूनुसार साजेशे शंख, शिंपले वापरावे लागतात. आधी कलाकृती कागदावर त्या रेखाटतात. त्यानंतर शंख, शिंपल्यांची आकर्षक मांडणी करून ती प्रत्यक्षात अवतरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US War Ceasefire: 40 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला! इराण- अमेरिका यांच्यात युद्धविराम; पण 'त्या' 10 अटींवरुन जगात खळबळ

Goa Assembly Election: 2027 मध्ये रितेश नाईकच हवेत, मगोचा आग्रह; फोंडा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत दीपक ढवळीकरांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Pooja Naik: ‘सॉरी’वरच प्रकरण मिटवलं! कोलवाळ तुरुंग प्रशासनाचा घोळ; पूजा नाईक बेकायदा बाहेर

Ishan Badgujar Death Case: 'ड्रग्ज कॉकटेल'ने घेतला जीव, आता 'ते' 8 मित्र गोवा पोलिसांच्या रडारावर; ईशान बडगुजर मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घातक रसायनांचा शोध आता लागणार क्षणार्धात! चेन्नईतील संशोधकांनी विकसित केली अत्यंत वेगवान आणि अचूक तंत्रज्ञान प्रणाली

SCROLL FOR NEXT