Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Gyanesh Kumar Resignation Demand: दिल्लीतील जंतममंतर सध्या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. तेथील ‘नीट-यूजी’ पेपरफुटीच्या सरकारविरोधी आंदोलनात सामील होण्याची संधी हुकलेल्यांना नव्या आंदोलनामुळे त्याची ‘भरपाई’ करण्याची संधी मिळणार आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने जाणवलेल्या काही गोष्टी.
Gyanesh Kumar Resignation Demand
Gyanesh Kumar Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सुनील चावके

दिल्लीतील जंतममंतर सध्या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. तेथील ‘नीट-यूजी’ पेपरफुटीच्या सरकारविरोधी आंदोलनात सामील होण्याची संधी हुकलेल्यांना नव्या आंदोलनामुळे त्याची ‘भरपाई’ करण्याची संधी मिळणार आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने जाणवलेल्या काही गोष्टी.

राजधानी दिल्लीतील (Delhi) ऋतू नकळत कूस बदलत आहे. मॉन्सूनच्या समारोपासोबत असह्य उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीच्या वातावरणात पहाटे आणि सायंकाळी चोरपावलांनी गुलाबी थंडी अवतरायला सुरुवात झाली आहे. जून ते सप्टेंबरदरम्यानचा जीवघेणा उकाडा आता पडद्याआड गेला आहे. ल्युटन्स दिल्लीतील बहुतांश रस्त्यांवर सप्तपर्णीची असंख्य झाडे पांढऱ्या-हिरव्या फुलांनी बहरून मोहरून टाकणाऱ्या गंधानिशी गुलाबी थंडीला जोड देण्यासाठी सज्ज झाली आहेत.

वरकरणी सुखद वाटणारा हा मौसम खरे तर फसवा आहे. हे राजकीय वाऱ्यांबाबतही खरे आहे. उत्तरभारतात सप्तपर्णी ‘सैतानाचे झाड’ म्हणून ‘कुख्यात’ आहे. दिल्लीतील ऑक्टोबर-डिसेंबरच्या रम्य सायंकाळी सप्तपर्णीचा मादक गंध ‘अच्छे दिन’ आल्याची वर्दी देत वातावरण धुंद करून टाकतो. पण पादचाऱ्यांना मुग्ध करून आपल्याकडे आकृष्ट करणाऱ्या या ‘सैतानी’ झाडाच्या गुच्छेदार फुलांमधील परागामुळे अ‍ॅलर्जी निर्माण होऊन श्वसनरोग आणि अस्थमाचा विकार बळवतो. दिल्लीच्या राजकारणाशी तंतोतंत जुळणारी सुगंधासोबतची विषाक्तताही या झाडाला लाभली आहे. सप्तपर्णीच्या सालात भिनलेले विष उन्हाळ्यात सर्वाधिक असते आणि पावसाळ्यानंतर हळूहळू कमी होत जाते.

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi Women Statement: 'स्त्री ही कोणाचीही मालकी नाही'; राहुल गांधींच्या विधानापलीकडचा पुरुषसत्ताक व्यवस्थेवरील गंभीर सवाल

कॉक्रोच जनता पार्टीने ‘नीट-यूजी’ पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या संसदेवरील मोर्चामुळे टोकाचे विषाक्त झालेले दिल्लीचे राजकारण निवळल्याचा भास होत असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी निवडणूक आयोगात केलेल्या मनमानी कारभारामुळे पुन्हा तापले आहे. फरक एवढाच आहे की मौसम बदलल्याने सप्तपर्णीच्या गंधामुळे ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात तापलेल्या वातावरणाची तीव्रता जाणवेनाशी झाली आहे. सर्वसामान्यांच्या सरकारविरोधी आवाजाचे केंद्रस्थान ठरलेल्या जंतरमंतरवर २० जून ते २५ जुलैदरम्यान मरणाचा उकाडा होता. तशा वातावरणात दिल्ली पोलिसांनी आपली निर्दयता पणाला लावून आंदोलकांना झोडून काढल्यावरही त्यांचा प्रतिकार संपुष्टात येण्याऐवजी अनेकपटींनी उफाळून येत त्याची परिणती शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यात झाली.

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi Pune Visit: मुलींनो, जाचक रूढ चौकट तोडा! मनुस्मृतीची विचारधारा उखडून फेकण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन

पाच हजार जवान तैनात

अडीच महिन्यांनंतर जंतरमंतरवर घामाच्या धारा काढणारा उकाडा संपला असून त्याची जागा आल्हाददायक हवामानाने घेतली आहे. दरम्यानच्या काळात अमित शहांच्या दिल्ली पोलिसांनी आंदोलक फिरकू नये म्हणून जंतरमंतरला चोहोबाजूंनी बहुस्तरीय पिवळ्या लोखंडी बॅरिकेडनी घेरून टाकले आहे. या बॅरिकेडच्या रक्षणासाठी दिल्ली पोलिस, सीमा सुरक्षा दल, ‘आयटीबीपी’, ‘सीआयएसएफ’ आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे सुमारे पाच हजार जवान दिवसरात्र तैनात केले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबरपासून ‘जंतरमंतर-२.०’ची घोषणा करीत या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची कसोटी घेण्याचे ठरविले आहे.

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi: भाजपविरोधी असलेले वातावरण टिकवा आणि तीव्र करा; राहुल गांधी

जंतरमंतरच्या सुरक्षेत किती दम आहे, याची चाचपणी करण्यासाठी विद्यार्थी आणि नागरी संघटनांनी वीकएंडला केलेल्या रंगीत तालमीतून आंदोलकांना हाताळताना दिल्ली पोलिसांमध्ये झिरपलेली अरेरावी संपली नसल्याची जाणीव करून दिली आहे. ज्या जंतरमंतर परिसराला सुरक्षा देण्याची जबाबदारी जंतरमंतर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून समान अंतरावर असलेल्या संसद मार्ग पोलिस ठाण्याची आहे. पण गुन्हे दाखल करण्यात सतत कुचराई करणाऱ्या आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे संसद मार्ग पोलिस ठाण्याभोवतीच सुरक्षेचे कडे निर्माण करण्याची वेळ आली आहे.

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi: 'व्हिडिओ प्रूफ' ते 'नरेंद्र..सरेंडर'!! सुरक्षा दलांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का? राहुल गांधींच्या भूमिकेवर तीव्र टीका

मोदी सरकार, निवडणूक आयोग, कॉक्रोच जनता पार्टी, इंडिया आघाडीतील विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांच्या ‘सौजन्या’ने राजधानी दिल्ली आणि देशभरात सध्या आंदोलनाबद्दलचे आकर्षण शिगेला पोहोचले आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू होणारे आंंदोलन त्यामुळेच मोदी सरकारसाठी डोकेदुखीचे कारण ठरेल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबरपासून नवरात्राचा महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे.दिल्ली पोलिसांच्या २० जुलैच्या अत्याचाराचा कहर कदाचित उष्ण हवामानासोबत संपलेला आहे. कारण २० जुलैची पुनरावृत्ती झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. जंतरमंतरकडे जाणारे सारे रस्ते, मेट्रो स्थानके, त्या परिसरातील इंटरनेट बंद करणे सरकारला परवडणार नाही. मेट्रो आणि बसेससह जंतरमंतरकडे जाणारी वाहतूक बंद केली तरी पोषक हवामानामुळे आंदोलकांना पायी चालत जाणे शक्य होणार आहे.

संपर्क साधण्याचे तंत्र जेन-झींनी आत्मसात केल्यामुळे इंटरनेट ठप्प केल्याने फारसे काही साध्यही होण्याची शक्यता नाही. जंतरमंतरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅनॉट प्लेस परिसरात मध्यरात्रीच्या सुमारासही वीस-तीस हजार लोक वावरत असतात. जंतरमंतरवर दिवसा आणि रात्री उसळणाऱ्या गर्दीचे भारतीय न्याय संहितेतील कलम १६३ लावून नियंत्रण करण्याचे आव्हान २० जुलैनंतर निर्माण झालेल्या चौफेर दबावाखाली आलेल्या दिल्ली पोलिसांपुढे असेल. २०१२मधल्या निर्भया कांडानंतर डिसेंबर महिन्यात झालेले रायसीना हिल्स आणि विजय चौकात झालेले आंदोलन मनमोहन सिंग सरकारच्या अंगलट आले होते.

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला देशाचे शत्रू का म्हटले? विद्यार्थ्यांना दिला 'हा' मेसेज

त्यानंतर प्रथमच ऐन सणासुदीच्या मोसमात ज्ञानेशकुमारच्या राजीनाम्याच्या निमित्ताने सरकारविरोधातील दुसरे मोठे आंदोलन होऊ घातले आहे. जंतरमंतरवर आंदोलकांची ‘सप्तपर्णी’ बहरून येणार आहे आणि तिकडे फिरकण्यातले धोके ठाऊक असूनही सरकारला नाइलाजाने उपरोध-विनोद-प्रतिकाराची अ‍ॅलर्जी ओढवून घ्यावी लागणार आहे. सप्तपर्णीच्या साह्याने सर्पदंश, कर्करोग. अतिसार आणि हिवतापासारख्या आजारांवर इलाज केला जातो असे मानले जाते. पण सप्तपर्णीचे लाकूड जेन-झींसाठी उपयुक्त ठरलेल्या पेन्सिल आणि फळ्याच्या निर्मितीसाठीही वापरले जाते. डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या सप्तपर्णीच्या बहराच्या मोसमात यंदा दिल्ली पोलिसांचा ‘इलाज’ प्रभावी ठरेल की मतदारयाद्यांमधून १३ कोटी ३० लाख मतदारांची नावे वगळणारे ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू पाहणाऱ्या ‘बुद्धिजीवीं’ची जिद्द, याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com