Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Monsoon Rain Deficit: गेल्‍या १०७ वर्षांतील सर्वांत कमी मान्‍सूनच्‍या पावसाची नोंद यंदा झाली असतानाच, मान्‍सूनोत्तर पाऊसही राज्‍याकडे पाठ फिरवण्‍याची शक्‍यता आहे.
Goa Monsoon Rain Deficit
Goa Monsoon Rain DeficitDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गेल्‍या १०७ वर्षांतील सर्वांत कमी मान्‍सूनच्‍या पावसाची नोंद यंदा झाली असतानाच, मान्‍सूनोत्तर पाऊसही राज्‍याकडे पाठ फिरवण्‍याची शक्‍यता आहे.

मान्‍सून हंगाम ३० सप्‍टेंबर रोजी संपल्‍यानंतर १ ऑक्‍टोबरपासून काही भागांत मान्‍सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. परंतु, गतवर्षीच्‍या पहिल्‍या चार दिवसांच्‍या तुलनेत हा पाऊस ९९.४ टक्‍क्‍यांनी कमी असल्‍याचे हवामान खात्‍याच्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Goa Monsoon Rain Deficit
Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

मान्‍सूनचा पाऊस यंदा राज्‍यात ५ जून रोजीच दाखल झाला होता. त्‍यानंतर काही दिवस वगळता राज्‍यात पावसाने अखेरपर्यंत विश्रांती घेतली. त्‍यामुळे मान्‍सून काळात यंदा केवळ ८०.९२ इंच पावसाची नोंद झाली, ज्‍याची गेल्‍या १०७ वर्षांतील सर्वांत कमी पाऊस म्‍हणून नोंद झाली. मान्‍सून हंगाम संपल्‍यानंतरच्‍या चार दिवसांतही मान्‍सूनोत्तर पावसाने (Rain) साखळी, वाळपई, काणकोण आदी भागांत हजेरी लावली. काणकोण परिसरात रविवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळनंतर पावसाने जोर धरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com