Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

AAP Attacks Congress: विधानसभा निवडणूक जवळ येईल, तसतसे आम आदमी पक्षाने (आप) काँग्रेसला चहुबाजूंनी घेरण्‍यास सुरुवात केली आहे.
AAP Attacks Congress
AAP Attacks Congressai janret image
Published on: 
Updated on: 

पणजी: विधानसभा निवडणूक जवळ येईल, तसतसे आम आदमी पक्षाने (आप) काँग्रेसला चहुबाजूंनी घेरण्‍यास सुरुवात केली आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून गेल्‍या दोन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपमध्ये गेलेल्‍या १८ आमदारांचा मुद्दा ऐरणीवर आणत, ‘एक कचोरी, दोन समोसा, या काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?’ अशा सोशल पोस्‍टद्वारे काँग्रेसचे जिंकून येणारे आमदार भविष्‍यात निश्‍चितपणे भाजपमध्ये जाणार, असे मतदारांवर बिंबवण्‍याची मोहीम ‘आप’ने सुरू केली आहे.

विधानसभा निवडणूक नजीक येत आहे. त्‍यामुळे राजकीय पक्ष आक्रमक बनत आहेत. त्‍यातून एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्‍न होत आहेत. तथापि, काँग्रेस (Congress) व आरजीमध्‍ये आघाडीसंदर्भात चर्चा पूर्ण झाली असली, तरी जागावाटपाच्‍या चर्चेला अजून अंतिम रूप आलेले नाही. त्‍यातच आम्‍ही २५ जागांवर काम करीत असल्‍याचा दावा करीत काँग्रेसकडून अधिकाधिक जागा मिळवण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे संकेत आरजीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेश बोरकर यांनी दिले आहेत. ‘आप’ने सोशल मीडियाद्वारे डिवचल्‍यानंतर काँग्रेसने ‘आप’वर निशाणा साधला आहे.

AAP Attacks Congress
Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

‘आप’ची सुकाणू समिती जाहीर

येत्‍या विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’कडून प्रदेशाध्‍यक्ष वाल्‍मिकी नाईक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सुकाणू समितीची स्‍थापना केली आहे. या समितीत सदस्‍य म्‍हणून आमदार व्‍हेन्‍झी व्‍हिएगस, क्रूझ सिल्‍वा, जेर्सन गोम्‍स, प्रशांत नाईक आणि संदेश तेलेकर देसाई यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com