Amthane Dam: धक्कादायक! आमठाणे येथे मगरीने महिलेला खेचले धरणात, महिलेचा मृत्यू

एक महिला कपडे धुण्यासाठी गेली असता तिला मगरीने धरणात ओढून नेले आहे.
women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothes
women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothesDainik Gomantak

women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothes: डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला हात धुण्यासाठी धरणाजवळ गेली असता तिला मगरीने धरणात खेचले आहे. दरम्यान, 48 वर्षीय या महिलेचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आज (शनिवारी, दि.20) दुपारी ही घटना घडली.

संगीता बाबलो शिंगाडी (वय 48) असे मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या या मगरीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता या शेळ्या घेऊन घरी परतत असताना आमठाणे धरणाजवळ हात धुण्यासाठी थांबल्या. जवळ असलेल्या रूमालासह त्यांनी पाण्यात हात घातला याचवेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने महिलेच्या हाताला चावा घेत पाण्यात खेचले. दरम्यान, या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com