Goa Job Dainik Gomantak
गोवा

Minister Shripad Naik on Job in Goa : 'त्या' 64 गोमंकियांना नियुक्ती पत्रे प्रदान

देशभरात 71,000 नियुक्ती पत्रांचे वितरण

दैनिक गोमन्तक

वास्को: रोजगार मेळाव्याअंतर्गत भरती झालेल्या सुमारे 71,000 युवकांना नियुक्ती पत्रांचे आज ( 22 नोव्हेंबर ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून नोडल युनिट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटतर्फे 64 जणांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

(Union Minister Shripad Naik awarded job appointment letters to 64 youths of Goa)

हेडलॅण्ड सडा येथील दिपविहार हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद रायगड,सीआयएसएफचे नोडल ऑफीसर कमांडन्ट रणजीत कुमार सहानी आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 71,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नियुक्त्यांना संबोधित केले.

नवीन नियुक्त्यांना नियुक्ती पत्रांच्या भौतिक प्रती देशभरातील 45 ठिकाणी ( गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता) सुपूर्द केल्या गेल्या. शिक्षकांच्या पूर्वी भरलेल्या पदांच्या श्रेणींव्यतिरिक्त. व्याख्याते, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये गृह मंत्रालयाकडून लक्षणीय पदे भरली जात आहेत.

आज पंतप्रधान कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूलचा शुभारंभ केला. मॉड्यूल हा विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी एक ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सरकारी नोकरांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नैतिकता आणि सचोटी, मानव संसाधन धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल जे त्यांना धोरणांशी जुळवून घेण्यास मदत करतील. असे मंत्री नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT